ETV Bharat / bharat

व्हायब्रंट गुजरात समिट 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या राष्ट्रपतींसोबत करणार रोड शो - यूएईचे राष्ट्रपती

Vibrant Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हायब्रंट गुजरात समिट 2024 च्या उद्घाटनासाठी तीन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अहमदाबाद विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आदींची उपस्थिती होती.

Vibrant Summit 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
author img

By ANI

Published : Jan 9, 2024, 9:49 AM IST

अहमदाबाद Vibrant Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आदींनी स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये व्हायब्रंट समिट 2024 चं उद्घाटन करणार आहेत. या समिटमध्ये अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गांधीनगर सज्ज झालं आहे.

  • Landed in Ahmedabad a short while ago. Over the next two days, will be taking part in the Vibrant Gujarat Summit and related programmes. It is a matter of immense joy that various world leaders will be joining us during this Summit. The coming of my brother, HH @MohamedBinZayedpic.twitter.com/Ygaajg4TfM

    — Narendra Modi (@narendramodi) January 8, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • આદરણીય પ્રધાનમંત્રીશ્રી, વીતેલા બે દાયકામાં આપના દિશાદર્શનમાં વાઈબ્રન્ટ ગુજરાત ગ્લોબલ સમિટે ગુજરાતને દેશનું ગ્રોથ એન્જિન બનાવવામાં મહત્ત્વની ભૂમિકા ભજવી છે. આપની અધ્યક્ષતામાં 'ગેટવે ટૂ ધી ફ્યુચર' ની થીમ સાથે યોજાઇ રહેલ આ 10મી વાઈબ્રન્ટ સમિટ ગુજરાતના ફ્યુચરિસ્ટિક વિકાસને નવી ઊર્જા… https://t.co/BxbonsLVUj

    — Bhupendra Patel (@Bhupendrapbjp) January 8, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जागतिक नेत्यांसोबत होणार बैठका : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱयावर गेले आहेत. त्यांचं अहमदाबाद विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळ ते इंदिरा ब्रिज या 9 किमीच्या रस्त्यावर रोड शो करणार आहेत. त्यामुळं या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गांधीनगरला एनएसजी कमांडोचा वेढा : गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात समिट 2024 चं आयोजन करण्यात आल्यानं देश विदेशातील अनेक दिग्गज नेते गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं गांधीनगरमध्ये तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि देश विदेशातील प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिग्गज नेते गांधीनंगरमध्ये येणार असल्यानं एनएसजी कमांडोनं शहराला वेढा दिला आहे. गांधीनगरची सुरक्षा व्यवस्था सहा झोनमध्ये तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त डीजींच्या नेतृत्वाखाली 6 पोलीस महानिरिक्षक, 69 पोलीस अधीक्षक, 223 पोलीस उपाधीक्षक, 6500 पेक्षा पोलीस जवान कर्तव्य बजावणार आहेत. याशिवाय एक हजार कमांडो आणि 8 क्विक रिस्पॉन्स पथकही तैनात करण्यात आले आहेत. या संपूर्ण परिसरावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमादाबादच्या विमानतळावर उतरल्यानंतर 'एक्स' या सोशल मीडिया साईटवर गुजरात समिटबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी " थोड्या वेळापूर्वी अहदावादला उतरलो आहे. पुढील दोन दिवसात गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये सहभाग घेणार आहे. यूएईचे राष्ट्रपती माझे बंधूतुल्य मोहम्मद बिन झायेद यांचं गुजरात समिट 2024 ला येणं माझ्यासाठी खूप खास आहे. व्हायब्रंट समिटशी माझा खास संबंध आहे. गुजरातच्या विकासात हातभार लावला आहे. यातून अनेक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळं मला आनंद होत आहे," असं त्यांनी पोस्ट शयर करत नमूद केलं आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनीही माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या रामभूमीतून फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ
  2. बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचा विजय, पाचव्यांदा होणार पंतप्रधान, मोदींनी केलं अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.