नवी दिल्ली- विश्व हिंदू परिषदेने आंध्र प्रदेशातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशातील विजयनगरमधील रामतीरधाम गावातील रामाच्या मंदिराचे कुलुप तोडून मूर्तींची तोडफोड कऱण्यात आली होती. या घटनेचा विहिप ने निषेध नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात ४०० वर्षापूर्वीच्या रामाच्या मुर्तीची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करत विहीपने रेड्डी सरकारवर निशाणा साधला आहे.
विहिपचे सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले की, गेल्या तीन दिवसात मंदिरांवर हल्ला झालेली ही चौथी घटना आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये गिदावरीतील घटी मंदिरातील रथ जाळल्याची घटना घडली होती.
परांडे म्हणाले दिवसेंदिवस मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, या हल्ल्यांना थांबविण्यात जगमोहन रेड्डींचे सरकार अपयशी ठरत आहेत. परिणामी हिंदू समाजात रेड्डी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगारांनाविरुद्ध कठोर कारवाई कऱण्याची मागणी विहिपने केली आहे. तसेच सगळ्या मंदिरातील सुरक्षा वाढविण्याची मागणीही विहिपने केली आहे.