ETV Bharat / bharat

Verdict on mohammad zubair bail: मोहम्मद जुबेरच्या जामीन अर्जावर आज निकाल - किसी से ना कहना

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातील सत्र न्यायालय आज मोहम्मद जुबेरच्या जामीन अर्जावर निकाल देणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी १४ जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता.

मोहम्मद जुबेरच्या जामीन अर्जावर आज निकाल

author img

By

Published : Jul 15, 2022, 10:45 AM IST

नवी दिल्ली: ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांच्या जामीन याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयातील सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी १४ जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता. (Verdict on mohammad zubair bail) आज निकाल काय लागेल याची उत्सुकता आहे.

'ते ट्विट' चित्रपटालीतल वाक्य - सुनावणीदरम्यान झुबेरची बाजू मांडणाऱ्या वकील वृंदा ग्रोवर यांनी सांगितले होते की, एफआयआरमध्ये दिलेले झुबेर यांचेचे ट्विट हे 1983 मधील 'किसी से ना कहना' या चित्रपटातील एक वाक्य आहे. 2 जुलै रोजी दिल्लीत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पटियाला हाऊस कोर्टाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी स्निग्धा सरवरिया यांनी झुबेर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. जुबेर यांना २७ जून रोजी अटक करण्यात आली होती. जुबेरवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. धार्मिक भावना भडकावण्यासोबतच, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झुबेरविरुद्ध भारतीय दंड संहितेची कलम १२०बी, २०१ आणि एफसीआरएची कलम ३५ प्रमाणेही गुन्हा नोंद केला आहे.

इतर ठिकाणीही एफआयआर - उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्येही झुबेरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तीन संतांना 'हेटमॉंगर' म्हणून ट्विट केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीतापूरमध्ये नोंदवलेल्या एफआयआरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै रोजी झुबेर यांना पुढील आदेशापर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. सीतापूरशिवाय युपीमध्ये झुबेरविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.