हैदराबाद : ‘वसु बारस’ हा सण साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या कृषी संपत्तीचा म्हणजेच आपल्या गायींचा सन्मान करणं आहे. हिंदू धर्मात गायीला मानवजातीचं पोषण करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि मातृत्व मानलं जातं. या दिवशी विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी भगवान श्रीकृष्णासोबत गायीची पूजा करतात. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार वसु बारस हा सण आज 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे.
वसु बारस पूजा विधी : कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते, जेव्हा सूर्य देव पूर्णपणे मावळलेला नसतो. पूजेपूर्वी त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घालण्यात येतो. त्यांच्या कपाळावर सिंदूर किंवा हळदीचा तिलक लावला जातो. काही ठिकाणी गाय, वासरू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. त्यांना गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग भोग म्हणून दिले जातात. यानंतर आरती केली जाते. भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे मुख्य साधन असल्यानं या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात.
वसु बारसचे महत्त्व : वसु बारस (गोवत्स द्वादशी) चे महत्व भविष्य पुराणात सांगितलं आहे. याला बच्च बारसचा सण असेही म्हणतात. हा सण नंदिनी व्रत या नावानेही साजरा केला जातो, कारण शैव परंपरेत नंदिनी आणि नंदी (बैल) दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात. हा सण मुळात गाईंबद्दल मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची एकत्र पूजा केली जाते. पूजेदरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला दिले जातात. असे मानले जाते की गोवत्स द्वादशीची पहिली पूजा राजा उत्तानपाद (स्वयंभू मनूचा मुलगा) आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून साजरी केली होती. त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळे त्यांना ध्रुव नावाचा मुलगा झाला. या दिवशी उपासक गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत. काही उत्तरेकडील राज्यांमध्ये या दिवसाला वाघ म्हणून संबोधले जाते, म्हणजे आर्थिक कर्जाची परतफेड. या दिवशी व्यापारी आपले खाते साफ करतात. या दिवशी नवीन खात्यात व्यवहार करू नका. या व्रत आणि उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे.
हेही वाचा :