ETV Bharat / bharat

PM Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या विविध योजना; ज्यांनी देशवासीयांचे आयूष्य बदलले - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे भारताचे 16 वे पंतप्रधान आहेत. त्यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस PM Birthday आहे. त्याबद्दल त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत त्यांनी आणलेल्या विविध योजनांच्या आढावा आपण घेणार आहोत. यात जन-धन योजना Jan Dhan Yojana , आधार Aadhaar , स्वच्छ भारत मिशन, मेक इन इंडिया अशा विविध योजनांचा समावेश आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Sep 16, 2022, 5:57 PM IST

Updated : Sep 16, 2022, 10:50 PM IST

जन-धन योजना - जन-धन योजना Jan Dhan Yojana ही भारत सरकारची एक आर्थिक समावेशक योजना आहे. जी भारतातील सर्व नागरिकांसाठी खुला आहे. 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे किंवा अल्पवयीन मुले देखील जन धन योजनेचा फायदा घेऊ शकतात. बँक खाती, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यांसारख्या सरकारी सेवांचा फायदा घेण्यासाठी या योजना निर्माण केल्या आहेत. ही आर्थिक समावेशक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केली. या योजनेअंतर्गत उद्घाटनाच्या दिवशी 15 दशलक्ष बँक खाती उघडण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या कामगिरीची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा वाढदिवस ( PM Birthday ) आहे.

आधार - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार ( Aadhaar ) कार्ड ही योजना मोदीजींनाच सुरू केली आहे. भारतातील सर्व रहिवाशांना 12-अंकी ओळख क्रमांक या माध्यमातून देम्यात आला आहे. तुम्ही आधार सेवा केंद्रांवर (ASKs) तुमची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती देऊन आधार कार्ड बनवू शकता.

स्वच्छ भारत मिशन - स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत अभियान Swachh Bharat Yojana हे भारत सरकारने उघड्यावर शौचास जाणे आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी 2014 मध्ये सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 मध्ये सुरू केलेल्या निर्मल भारत अभियानाची ही पुनर्रचित आवृत्ती आहे. स्वच्छ भारत मिशनचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2019 पर्यंत चालला. 2020-21 आणि 2024-25 दरम्यान फेज 1 च्या कामाला मदत करण्यासाठी टप्पा 2 राबविण्यात येत आहे.

मेक इन इंडिया - मेक इन इंडिया ही भारत सरकारची एक यशस्वी मोहीम Make in India Yojana आहे. ज्यामुळे तरूणाईला मोठा हातभार मिळाला. भारतीय बनावटीच्या वसतू तयार होण्यास मदत झाली. उत्पादन करणे आणि असेंबल करणे आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे यासाठी प्रोत्साहन दिले जाते. गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, आधुनिक आणि कार्यक्षम पायाभूत सुविधा विकसित करणे आणि परदेशी भांडवलासाठी नवीन क्षेत्रे उघडणे हा धोरणात्मक दृष्टिकोन यात आहे.

आयुष्मान भारत योजना - आयुष्मान भारत योजना Ayushman Bharat Yojana ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती. या योजनेची घोषणा माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारक) आरोग्य विमा प्रदान करणे आहे. या अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान केला जाते. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंबे या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 रोजी भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमधील रांची जिल्ह्यातून ही योजना सुरू केली होती.

नमामि गंगे - नमामि गंगे हे नदी संवर्धन अभियान Namami Gange Yojana आहे. ज्याला केंद्र सरकारने जून 2014 मध्ये 20,000 कोटी खर्चासह "फ्लॅगशिप प्रोग्राम" म्हणून मान्यता दिली होती. गंगा नदीचे प्रदूषण नियंत्रण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. यात विविध देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान, कंपन्या, गुंतवणूकदार यासारख्या विविध गटांना जोडेल गेले. नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत, अयोध्येतील धार्मिक आणि ऐतिहासिक शहरातील सरयू नदीमध्ये पडणाऱ्या सर्व नाल्यांचे दूषित पाणी सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये नेले जात आहे.

बेटी बचाओ, बेटी पढाओ - बेटी बचाओ, बेटी पढाओ ही भारत सरकारची मोहीम Beti Bachao, Beti Padhao Yojana पंचप्रधान मोदी यांनी सुरू केली आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि दिल्लीत मुलींसाठी ही योजना आमलांत आणली गेली. या योजनेद्वारे मुलींना शिक्षण क्षेत्राात मदत केली जाते. भारतात बाल लिंग गुणोत्तर सातत्याने घसरत चालले आहे. 2011 च्या जनगणनेत, भारतातील बाल लिंग गुणोत्तर 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलींपैकी 919 स्त्रिया होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ (BBBP) योजना 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे जो महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे चालवला आहे.

मन की बात - मन की बात Mann ki Baat हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेला एक भारतीय रेडिओ कार्यक्रम आहे. ज्यामध्ये ते ऑल इंडिया रेडिओ, डीडी नॅशनल आणि डीडी न्यूजवर देशवासीयांना संबोधित करतात.3 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्या शोपासून आतापर्यंत 92 भाग झाले आहेत. 92 वा भाग 28 ऑगस्ट 2022 रोजी प्रसारित झाला आहे. जुलै 2021 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी राज्यसभेत दिलेल्या निवेदनानुसार, "दैनंदिन प्रशासनाच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद प्रस्थापित करणे" हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम भारतातील "पहिला समृद्ध रेडिओ कार्यक्रम" आहे.

Last Updated : Sep 16, 2022, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.