ETV Bharat / bharat

Vaishali Ammonia Leak: बिहारमध्ये दूध कारखान्यात अमोनिया गॅस गळती; एकाचा मृत्यू तर शंभरहून अधिक लोकांची प्रकृती गंभीर - कारखान्यात गॅस गळती

वैशाली येथील दूध कारखान्यात अमोनिया गॅस गळती झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर शंभरहून अधिक लोक आजारी आहेत. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमीही झाले आहेत. गळतीनंतर गॅसचा वास 4 किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत पसरला होता.

Vaishali Ammonia Leak
अमोनिया गॅस गळती
author img

By

Published : Jun 25, 2023, 7:40 AM IST

पाटणा : बिहारमधील हाजीपूरमध्ये काल रात्री एका दूध कारखान्यात गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. त्यापैकी ३५ जणांवर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित रुग्णांना खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो बाहेर कुठेतरी राहत होता आणि राज फ्रेश डेअरीत काम करत होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

लोकांना श्वास घेण्यास त्रास : कारखान्यातून सोडलेला अमोनिया वायू हवेत विरघळला आणि सुमारे चार किलोमीटरपर्यंत पसरला, त्यामुळे अनेकांना बाधा झाली, डझनभर लोक आजारी पडले आणि वायूच्या दुर्गंधीमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, असे सांगण्यात येते. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपूत कॉलनीपासून पासवान चौकापर्यंत गॅसचा वास नगर पोलिस ठाण्यापर्यंत पसरला. त्यामुळे 100 हून अधिक लोक आजारी पडले. मात्र, १५ ते २० मिनिटांत गॅसगळती आटोक्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न : स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त अग्निशमन दलाचे पथक तसेच पाटणा येथील क्यूआरटीचे पथक अजूनही कारखान्यात उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वैशालीचे डीएम जसपाल मीना, वैशालीचे एसपी रवी रंजन कुमार आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी हाजीपूर औद्योगिक पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या राज फ्रेश फॅक्टरीजवळ पोहोचले. याशिवाय अग्निशमन दल आणि एसजीआरएसचे पथकही लोकांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अमोनिया वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुमारे 3 अग्निशमन गाड्यांमधून पाणी शिंपडण्यात आले. अपघातामुळे हाजीपूर शहरात रात्रभर गोंधळाचे वातावरण होते.घटनेच्या वेळी कारखान्यात किती लोक उपस्थित होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे, हे सध्या तरी कळू शकलेले नाही. मात्र सर्व काही आटोक्यात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अशा परिस्थितीत दुग्धशाळेत घडलेली ही घटना केवळ अपघात आहे की निष्काळजीपणाचा परिणाम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

  1. Ludhiana Gas Leak: गॅस गळतीनंतर नेमके काय घडले? स्थानिकांनी दिल्या 'या' प्रतिक्रिया
  2. Gas Leak in Ludhiana factory : लुधियानामधील कारखान्यात गॅस गळती, 11 जणांचा मृत्यू
  3. परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती; लोकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.