ETV Bharat / bharat

काही वेळातच सिलक्यारा बोगद्यातून कामगार येणार बाहेर, रुग्णवाहिका, चिनूक हेलिकॉप्टरही सज्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 8:52 AM IST

Updated : Nov 23, 2023, 11:25 AM IST

Uttarakhand Tunnel Rescue : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी करण्यात येणारं बचावकार्य आता अंतिम टप्प्यात आलं आहे. बोगद्यातील हे कामगार कधीही बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uttarakhand Tunnel Rescue
सिलक्यारा बोगदा बचावकार्य अंतिम टप्प्यात

देहरादून Uttarakhand Tunnel Rescue : सिलक्यारा बोगदा अपघातातील बचावकार्य अंतिम टप्प्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेले 41 मजूर कधीही बाहेर येऊ शकतात. उत्तरकाशीच्या चारधाम रोड प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढताच रुग्णालयात दाखल करण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील उत्तरकाशीत डेरेदाखल झाले आहेत. बोगद्याच्या बाहेर 41 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तर गंभीर झालेल्या कामगारांना एअर लिफ्ट करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बचावकार्य अंतिम टप्प्यात असून काही अडथळे आहेत. मात्र कामगारांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी मला आशा आहे. बचावानंतरची तयारी सुरू करण्यात आली आहे. कामगारांची तपासणी, उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दररोज बचावकार्याचं अपडेट घेत आहेत. याबाबत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सगळं अपडेट घेतलं आहे.- मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी दाखल : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सिलक्यारा बोगदा बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी "ऑगर मशीननं 45 मीटर पाइपलाइन टाकण्यात आली. बचावकार्य अंतिम टप्प्यात असून काही अडथळे आहेत. मात्र कामगारांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी मला आशा आहे. बचावानंतरची तयारी सुरू करण्यात आली आहे. कामगारांची तपासणी, उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दररोज बचावकार्याचं अपडेट घेत आहेत. याबाबत सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सगळं अपडेट घेतलं आहे. आमचे तज्ज्ञ कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत" असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावेळी सांगितलं.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Uttarakhand CM Pushkar Singh Dhami says "45 metres of pipeline has been laid through auger machine. The rescue is at its final stages. There are some obstacles,. but I hope that the workers are rescued as early as possible.… pic.twitter.com/FJRkCvX8v7

    — ANI (@ANI) November 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोस्ट रेस्कू ऑपरेशन प्लॅन आहे तयार : सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार कोणत्याही वेळी बाहेर येऊ शकतात, असं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. आता प्रशासनानं बचावानंतरचा कृती आराखडा तयार केला आहे. याबाबतची माहिती उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी "आमचा बचावानंतरचा कृती आराखडा तयार झाला आहे. आम्ही कामगारांना ग्रीन कॉरिडॉरमधून तत्काळ नेऊन त्यांना शक्य तितके चांगले उपचार देणार आहोत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना चिन्यालिसौर आणि गरज पडल्यास ऋषिकेशला नेलं जाईल. बोगद्याच्या घटनास्थळी केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग (निवृत्त) आणि सचिव देखील येणार आहेत" अशी माहितीही पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel incident | Uttarkashi SP Arpan Yaduvanshi says, "...Our post-rescue action plan is ready. We will take the workers through the green corridor with a police escort and make sure that the best possible treatment is being provided to them. I… pic.twitter.com/lZjmYOi8xB

रात्रभर चाललं बचावकार्य : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं मोठी कसरत केली आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मध्यरात्रीपर्यंत बचावकार्य पूर्ण होईल, असं वाटत होतं. मात्र खोदकामाच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानं मध्यरात्री बचावकार्य पुर्ण होऊ शकलं नाही.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Medical equipment reach the Silkyara tunnel site where the rescue operation is underway to bring out the trapped workers. pic.twitter.com/qseYHYMtYY

ऑगर ड्रिलिंग मशीनला लागले स्टीलचे पाईप : अमेरिकन हेवी ऑगर ड्रिलिंग मशीनला स्टीलचे पाईप लागल्यानं ते कापून काढावे लागले. आता स्टीलचे पाइप कापून काढण्यात आले आहेत. बचाव कार्यासाठी ड्रिलिंगचं काम वेगानं सुरू आहे. बोगद्यात पडलेला ढिगारा भेदून टीम कधीही आपलं काम पूर्ण करुन मजुरांना बोगद्याच्या बाहेर काढू शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Prayers being offered at a temple that has been built at the main entrance of the tunnel where rescue operations to bring out the trapped workers are underway.

    A part of the Silkyara tunnel collapsed in Uttarkashi on November… pic.twitter.com/T77WyCfS6v

उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी पोहोचले बोगद्यात : उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला हे बोगद्यात बचाव कार्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. "सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य अंतिम टप्प्यात सुरू आहे", असं त्यांनी यावेळी सांगितलं. बचावकार्य पथकातील गिरीश सिंह रावत यांनी "बचाव कार्य जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढच्या एक ते दोन तासात हे बचावकार्य पूर्ण होईल, कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन टाकल्या जात आहेत" असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

  • Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | The preparations to rescue workers trapped inside the Silkyara tunnel are in the final stages and CM Pushkar Singh Dhami himself is present in Uttarkashi: Uttarakhand CMO

मुख्यमंत्री उत्तरकाशीत डेरेदाखल : सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार कधीही बाहेर येऊ शकतात. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे उत्तरकाशीत डेरेदाखल झाले आहेत. बोगद्याच्या बाहेर 41 रुग्णवाहिका लावण्यात आल्या आहेत. त्यासह भारतीय सैन्य दलाचं चिनूक हेलिकॉप्टर सज्ज करण्यात आलं आहे. आता फक्त 6 मिटर ड्रिलिंग बाकी आहे. त्यामुळे बोगद्यात अडकलेले मजूर काही वेळात बाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Former advisor to the Prime Minister's Office, Bhaskar Khulbe reaches the Silkyara tunnel site where the rescue operation is underway to bring out the trapped workers. pic.twitter.com/dFIMYbwRbM

हेही वाचा :

  1. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा व्हिडिओ आला समोर; वॉकी टॉकीद्वारे साधला संपर्क
  2. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाटत आहे अस्वस्थ, सलग आठव्या दिवशी बचाव मोहिम सुरू

Last Updated : Nov 23, 2023, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.