ETV Bharat / bharat

Uttar Pradesh 7 Phase : युपीत शेवटच्या टप्प्यात 54.18 टक्के मतदान; आता प्रतिक्षा निकालाची - UP Assembly elections 2022 LIVE

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
Uttar Pradesh
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:11 AM IST

Updated : Mar 7, 2022, 7:44 PM IST

18:04 March 07

सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदान

युपीत शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदान झाले आहे.

15:56 March 07

दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदान

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

13:43 March 07

दुपारी 1 पर्यंत ३५.५१ टक्के मतदान

सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात होत असलेल्या मतदानात दुपारी एक पर्यंत ३५.५१ टक्के मतदान झाले आहे.

13:03 March 07

सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी टि्वट करून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. 'नवीन शुभारंभासाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात तुमचे मत द्या, तसेच इतर मतदारांना त्यांच्या मताधिकाराचा योग्य वापर करण्यासाठी प्रेरित करा. जितकी जास्त मते तितकी लोकशाही मजबूत', असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं.

11:55 March 07

उत्तर प्रदेशात मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Uttar Pradesh election 2022 Phase 7 live updates
सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी

11:49 March 07

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठाचे मतदान

  • The elderly couple after casting their vote said, "We don't want to waste our votes, that's why came on a cart." pic.twitter.com/nLnvL1aBNb

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

10:16 March 07

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात नागरिक मतदानाचा हक्क बजावत असून सकाळी 9 वाजेपर्यंत 8.58 टक्के मतदान झाले आहे.

सातव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंतचे मतदान.

10:15 March 07

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात एकूण 613 उमेदवार मैदानात उतरले आहेत.

सातव्या टप्प्यात 613 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

10:12 March 07

उत्तर प्रदेश निवडणुकीत महिला निवडणूक लढवत आहेत.

सातव्या टप्प्यात 75 महिला रिंगणात

07:04 March 07

Uttar Pradesh Phase 7 Updates : युपीत विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा, 54 जागांसाठी मतदान सुरू

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत एकूण 7 टप्प्यात ( Uttar Pradesh Assembly elections 2022 ) मतदान होत आहे. आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. अनुक्रमे 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान आयोजित आहे. तर 10 मार्च 2022 रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 404 जागा आहेत. यात 403 जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा 202 इतका आहे.

पहिला टप्पा -

पहिला टप्पा 10 तारखेला पार पडला ( UP Election 2022 Phase 1 ) होता. पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 2.27 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात होते. यात 73 महिला होत्या. तर 2.27 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुसरा टप्पा -

दुसरा टप्पा 14 फेब्रुवरीला पार पडला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 ​​जागांसाठी मतदान झाले.

तिसरा टप्पा -

उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम यूपीतील फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, कासगंज आणि हाथरस या 5 जिल्ह्यांत मतदान झाले. झाशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात बुंदेलखंड प्रदेशात विधानसभेच्या 13 जागा आहेत. याशिवाय अवध प्रदेशातील कानपूर, कानपूर देहाट, औरैया, फर्रुखाबाद, कन्नौज आणि इटावा या 27 विधानसभा जागांवर मतदान झाले आहे. या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तिसऱ्या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने-सामने होते.

चौथा टप्पा -

चौथ्या टप्प्यात (UP 4th phase election) 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात होते. रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यात मतदान झाले. यात लखनऊसह रायबरेलीवरही विशेष लक्ष होते. कारण, हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. यासोबतच चौथ्या टप्प्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या निवडणूक रणनीतीचीही चाचपणी केली जात आहे.

पाचवा टप्पा -

उत्तरप्रदेशच्या पाचव्या टप्प्यासाठी 27 फेब्रुवारीला मतदान झाले. 12 जिल्ह्यांतील 61 विधानसभा मतदारसंघात 692 उमेदवार रिंगणात उतरले होते. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा आणि इतरांचे भवितव्य येत्या 10 मार्चला ठरणार आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 61 विधानसभा मतदारसंघात 693 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 90 महिला उमेदवार आहेत. अजय कुमार शुक्ला यांच्या मते, मतदानात 2.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये 1.20 कोटी पुरुष, 1.05 कोटी महिला आणि 1 हजार 727 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) मतदार आहेत.

सहावा टप्पा -

3 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा सहावा टप्पा पार पडला. सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यातील एकूण 57 जागांसाठी मतदान झाले. यात 676 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भाजपासाठी हा टप्पा निर्णायक होता. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. सहाव्या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कर्मभूमी असलेल्या गोरखपूरसह, आंबेडकर नगर, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीरनगर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आणि बलिया जिल्ह्यात मतदान झाले. गोरखपूर जिल्ह्यातील 9, आंबेडकर नगर जिल्ह्यातील 5, बलरामपूर जिल्ह्यातील 4 आणि सिद्धार्थनगर जिल्ह्यातील 5 विधानसभा, बस्ती जिल्ह्यातील 5, संत कबीरनगरमधील 3, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया आणि बलिया जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. पाच वेळा गोरखपूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांनी विधान परिषदेवर जाण्याला पसंती दिली होती. गोरखपूर शहराव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दयाशंकर सिंह बलिया सदर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. दयाशंकर माजी मंत्री नारद राय यांच्याशी लढत आहेत. योगी सरकारचे मंत्री उपेंद्र तिवारी, आनंदस्वरूप शुक्ला, सूर्य प्रताप शाही, स्वामी प्रसाद मौर्य आणि शलभ मणि त्रिपाठी यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे.

सातवा टप्पा -

आज 7 मार्चला सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात 9 जिल्ह्यातील 54 जागांवर मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आणि होमगार्डसोबतच निमलष्करी दलाचे जवानही मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी तैनात आहेत. सातव्या टप्प्यातील मतदानात 2.06 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी 1.09 कोटी पुरुष, 97.08 लाख महिला आणि 1027 तृतीय लिंग मतदार आहेत. या टप्प्यात 54 विधानसभा मतदारसंघात 613 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 75 महिला उमेदवार आहेत. मतदानावर करडी नजर ठेवण्यासाठी आयोगाकडून 52 सामान्य निरीक्षक, 9 पोलीस निरीक्षक आणि 17 व्यय निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

उत्तरप्रदेशातील 2017 चा निकाल

उत्तरप्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेचा कार्यकाळ 14 मे ला समाप्त होणार आहे. दरम्यान 14 मे पूर्वी यूपी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यूपीमध्ये 403 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. या अगोदर यूपीमध्ये विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 साली झाल्या होता. 2017 साली भाजपाच्या नेतृत्त्वाखाली एनडीएने 325 जागांवर यश मिळवले होते. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी 19 फेब्रुवारी 2017 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी यूपीमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

भाजपा - 325

एसपी - 47

बीएसपी - 19

काँग्रेस - 07

इतर - 05

Last Updated : Mar 7, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.