ETV Bharat / bharat

मास्क नव्हे तर भारतीय संस्कृतीच खरे 'कोरोना कवच'; उशा ठाकूर यांचे दिव्यज्ञान!

आपण मृत्यूलोकमध्ये राहत आहोत. याठिकाणी जीवन-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेलं आहे. त्यामुळे कोरोनाला उगाच घाबरुन मास्क वगैरे वापरण्याची गरज नसल्याचेही असेही उशा यावेळी म्हणाल्या. उशा ठाकूर स्वतःदेखील मास्क वापरत नाहीत.

author img

By

Published : Apr 8, 2021, 10:46 AM IST

usha-thakur-said-that-mask-is-not-necessary-to-protect-against-coronavirus-in-indore
मास्क नव्हे तर भारतीय संस्कृतीच खरे 'कोरोना कवच'; उशा ठाकूर यांचे दिव्यज्ञान!

भोपाळ : मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री उशा ठाकुर यांनी कोरोनाशी लढण्याचा नवा उपाय सांगितला आहे. मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या उपायांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला आहे. त्या इंदूरमध्ये कोरोनासंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर बोलत होत्या.

मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकार शक्ती वाढवा - उशा ठाकूर

जीवन-मृत्यू तर विधिलिखित..

आपण मृत्यूलोकमध्ये राहत आहोत. याठिकाणी जीवन-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेलं आहे. त्यामुळे कोरोनाला उगाच घाबरुन मास्क वगैरे वापरण्याची गरज नसल्याचेही असेही उशा यावेळी म्हणाल्या. उशा ठाकूर स्वतःदेखील मास्क वापरत नाहीत.

हेही वाचा : शेणाचा 'यज्ञ' केल्यास १२ तास घर निर्जंतुक राहते; मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा जावईशोध!

कोरोनापासून असा कराल बचाव..

ठाकूर म्हणाल्या, की राज्य सरकारकडे कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी साधने आहेत. त्यामुळे, काळजी करण्याची गरज नाही. लोकांना काही अडचणी येत आहेत, त्यादेखील सोडवल्या जातील. उशा ठाकूर स्वतः असे मानतात की नियमीत यज्ञ आणि अग्निहोत्र केल्यास कोरोनापासून बचाव शक्य आहे.

हेही वाचा : कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.