नवी दिल्ली: युपीएससीचे (UPSC) निकालात यशस्वी उमेदवारांपैकी 244 सर्वसाधारण प्रवर्गातील, 73 आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील, 203 इतर मागासवर्गीय, 105 अनुसूचित जाती आणि 60 अनुसूचित जमातीतील आहेत, असे आयोगाने म्हटले आहे. नागरी सेवा परीक्षा दरवर्षी युपीएससी द्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) मधील निवडक अधिकार्यांची प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.
परीक्षेचा लेखी किंवा मुख्य भाग जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आला होता आणि मुलाखती या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये घेण्यात आल्या होत्या. 80 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून एका उमेदवाराचा निकाल रोखण्यात आला आहे. व्वल तीन रँक धारकांव्यतिरिक्त, ऐश्वर्या वर्माने चौथे आणि उत्कर्ष द्विवेदीने पाचवा क्रमांक मिळविला आहे. "युपीएससीच्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉलजवळ एक 'फॅसिलिटेशन काउंटर' आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा, भरतीसंबंधी कोणतीही माहिती, स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 17:00 या दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 23385271 /23381125 /23098543 वर मिळवू शकतात " असे आयोगाने म्हणले आहे. निकाल www.upsc.gov.in. या UPSC च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील, असे आयोगाने म्हटले आहे.