ETV Bharat / bharat

ईडीच्या 'या' कारवाईवर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी, संसदेत गदारोळ होण्याची शक्यता - यंग इंडिया कार्यालय मुद्दा काँग्रेस नाराजी

संसदेचे पावसाळी अधिवेशन सतत गदारोळातून ( Uproar in parliament ) जात आहे. विरोधी पक्ष दररोज सभागृहात ( Young India office seal by ED ) गोंधळ घालत आहेत. आजही असेच काही ( Congress in parliament ) होण्याची शक्यता आहेत. ईडीकडून यंग इंडियन ऑफिस सील केल्याचा मुद्दा काँग्रेस दोन्ही सभागृहात ( Young India office ) उपस्थित करू शकते.

young India office seal by ED
यंग इंडिया कार्यालय ईडीकडून सील
author img

By

Published : Aug 4, 2022, 7:41 AM IST

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन सतत गदारोळातून ( Uproar in parliament ) जात आहे. विरोधी पक्ष दररोज सभागृहात ( Young India office seal by ED ) गोंधळ घालत आहेत. आजही असेच काही ( Congress in parliament ) होण्याची शक्यता आहेत. ईडीकडून यंग इंडियन ऑफिस सील केल्याचा मुद्दा काँग्रेस दोन्ही सभागृहात ( Young India office ) उपस्थित करू शकते. या मुद्द्याबाबत पक्षात प्रचंड नाराजी आहे. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने राज्यसभा आणि लोकसभेच्या आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सकाळी ९.४५ वाजता संसदेच्या आवारात होणार आहे. काँग्रेस सदर मुद्द्यांवर स्थगितीचा प्रस्ताव आणू शकते.

हेही वाचा - Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर

बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ - तत्पूर्वी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड कार्यालयावर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले.

सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त - मात्र, बुधवारी सायंकाळी काँग्रेस मुख्यालयाभोवती आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थान 10 जनपथच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त अचानक वाढला. दिल्ली पोलिसांनी मुख्यालयाकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा दावा काँग्रेसने केला. त्यावर, काँग्रेस मुख्यालयात आंदोलक जमू शकतात अशी माहिती होती, त्यामुळे कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. आज या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होऊ शकतो.

यंग इंडियनचे कार्यालय तात्पुरते सील - ईडीने बुधवारी दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड कार्यालयात असलेल्या यंग इंडियनचे कार्यालय तात्पुरते सील केले. ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात ही कारवाई करण्यात आली अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात आज दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.