लखनऊ : गायिका नेहा सिंह राठौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी तिला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तिच्याकडून सात प्रश्नांची उत्तरे मागविण्यात आली आहेत. पोलिसांनी नोटीस दिल्याचा व्हिडीओ नेहा सिंह राठौरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती व तिचा नवरा एकत्र दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान तिचे 'यूपी में का बा' हे गाणे चर्चेत आले होते.
-
Uttar Pradesh: Police issue notice to 'UP Mein Ka Ba' fame singer Neha Singh Rathore for inciting hatred
— ANI Digital (@ani_digital) February 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/er1gaPzsbM#Uttarpradesh #Nehasinghrathore pic.twitter.com/rvEtebko9T
">Uttar Pradesh: Police issue notice to 'UP Mein Ka Ba' fame singer Neha Singh Rathore for inciting hatred
— ANI Digital (@ani_digital) February 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/er1gaPzsbM#Uttarpradesh #Nehasinghrathore pic.twitter.com/rvEtebko9TUttar Pradesh: Police issue notice to 'UP Mein Ka Ba' fame singer Neha Singh Rathore for inciting hatred
— ANI Digital (@ani_digital) February 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/er1gaPzsbM#Uttarpradesh #Nehasinghrathore pic.twitter.com/rvEtebko9T
का दिली नोटीस? : ही नोटीस एका गाण्याशी संबंधित आहे. गायिका नेहा सिंह तिची गाणी यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करते. ति तिच्या गाण्यातून सरकारवर टोमणे मारते. रोजगार आणि इतर अनेक मुद्द्यांवर तिने आपल्या गाण्यांमधून सरकारवर निशाणा साधला आहे. तिची गाणी खूप लोकप्रियही झाली आहेत. अलीकडेच तिने 'यूपी में का बा सीझन 2' गायले आहे. या गाण्याबाबत पोलिसांनी तिला नोटीस दिली आहे. तिच्या गाण्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी नेहाला विचारले हे प्रश्न : नोटीसद्वारे उत्तर प्रदेश पोलिसांनी गायिका नेहा सिंहकडून सात प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितले आहे. नोटीसमध्ये विचारण्यात आले आहे की - 1 - व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः आहात की नाही?, २- व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही नेहा सिंग राठौरने 'यूपी में का बा सीझन 2' या यूट्यूब चॅनलवर आणि @nehafolksinger ट्विटर अकाउंटवर तुमच्या स्वत:च्या ईमेल आयडीने अपलोड केला आहे की नाही?, हे सांगा. 3- नेहा सिंह राठौर चॅनल आणि ट्विटर अकाउंट @nehafolksinger तुमचे आहे की नाही? जर होय, तर तुम्ही त्याचा वापर करत आहात की नाही?, 4- व्हिडिओमध्ये वापरलेले गाण्याचे शब्द तुम्ही स्वतः लिहिले आहेत की नाही?, 5- जर हे गाणे तुम्ही स्वतः लिहिले असेल तर तुम्ही ते प्रमाणित कराल की नाही?, 6- जर हे गाणे दुसर्याने लिहिले असेल तर तुम्ही लेखकाची पुष्टी केली आहे की नाही?, 7- या गाण्यातून निर्माण झालेल्या अर्थाचा समाजावर होणारा परिणाम तुम्हाला माहीत आहे की नाही
तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले : पोलिसांनी नोटिसीच्या शेवटी असे लिहिले आहे की, नेहा सिंह राठौर यांच्या गाण्यामुळे समाजात असंतोष आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी उक्त व्हिडिओवरील परिस्थिती स्पष्ट करणे उचित आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत त्याचे स्पष्टीकरण सादर करा. तुमचे उत्तर समाधानकारक नसल्यास, तुमच्याविरुद्ध आयपीसी सीआरपीसीच्या संबंधित कलमांनुसार न्याय्य म्हणून आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.