ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात हुकूमशाहीप्रमाणे राज्यकारभार - प्रियंका गांधी - योगी आदित्यानाथ

अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा तिसऱ्यांदा वाढविण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी केला. योगी सरकार कर्मचार्‍यांच्या लोकशाही हक्कांना दडपवण्याच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी
author img

By

Published : May 28, 2021, 9:11 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून एस्मा (ESMA - Essential Services Maintenance Act) अर्थात 'अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा' तिसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. यात 6 महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

राज्यात अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम तिसऱ्यांदा वाढविण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार हुकूमशाही पाळत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी केला. योगी सरकार कर्मचार्‍यांच्या लोकशाही हक्कांना दडपवण्याच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे, असे त्या म्हणाल्या.

'यूपी सरकार हुकूमशाही पाळत आहे. राज्यातील कर्मचारी संघटनांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यांच्याशी बसून बोलण्याऐवजी सरकारने तिसऱ्यांदा एस्पात मुदतवाढ केली आहे 'असे प्रियंकाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. सरकारची धोरणे कर्मचार्‍यांच्या लोकशाही हक्कांच्या विरोधात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

राज्य सरकारने गुरुवारी राज्यात एस्पावर मुदतवाढ लावत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सार्वजनिक सेवा, महामंडळ आणि स्थानिक अधिकारी यांच्या संपावर बंदी घातली. यासंदर्भातील अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली. या तरतुदीचे उल्लंघन केल्यास कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार कायद्याने पोलिसांना दिले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने मे 2020 मध्ये राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एस्पा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 25 नोव्हेंबर 2020 रोजी आणखी सहा महिन्यासाठी एस्पा लागू करण्यात आला होता. आता पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.