ETV Bharat / bharat

conversion case धर्मांतरण प्रकरणी युपी एटीएसकडून नागपूरमध्ये तिघांना अटक - धर्मांतरण प्रकरण

एटीएस लखनौची टीम महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर कांवरे उर्फ एडम, कौशल आलम और डॉक्टर अर्सलान यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे.

UP ATS
UP ATS
author img

By

Published : Jul 17, 2021, 8:44 PM IST

Updated : Jul 17, 2021, 9:03 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) धर्मांतरण प्रकरणात तिघांना नागपूरमधून अटक केली आहे. त्यांना शनिवारी रात्री लखनौमध्ये आणण्यात येणार आहे. तीनही आरोपींची लखनौ एटीएस मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे.

युपी एडीजीचे प्रशांत कुमार म्हणाले, के धर्मांतरण प्रकरणात सर्वात प्रथम उमर गौतम याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर चौकशीनंतर सलाउद्दीन, इरफान शेख, राहुल, भोला, मुफ्ती जहांगीर आलम और मन्नू यादव उर्फ अब्दुल मन्नान यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणातील आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

एटीएस लखनौची टीम महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर कांवरे उर्फ एडम, कौशल आलम और डॉक्टर अर्सलान यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. एडीजी एलओ यांच्या माहितीनुसार आरोपी उमर गौतमचे लोक हे लालच दाखवून इस्लाममध्ये धर्मांतरण करत होते. त्यांनी महिला, अनुसुचित जाती व जमाती तसेच गरीब लोकांना लालच दाखविली होती.

हेही वाचा-चीनबरोबरील सीमावादाचा विषय संसदेत गाजण्याची चिन्हे

काय आहे धर्मांतरण प्रकरण-
धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात तीन धर्मगुरूंची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले. एटीएस तिन्ही धार्मिक गुरूंची चौकशी करून धर्मांतर प्रकरणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळचा बीडचा असलेला इरफान हा दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेयरमध्ये इंटरप्रेटर म्हणून काम करतो. तो मूक-बधीर लोकांना इस्लाम शिकवतो. इरफाननेच मूक-बधिराला आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले. दुसरा युवक राहुल भोला हा स्वतः मूक बधिर आहे. तो या कामात इरफानची मदत करत होता. इरफानबाबत बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रदीप एकशिंगे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सिरसाळा पोलीस ठाण्याला या प्रकरणाबाबत कुठलीच लेखी माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी सिरसाळा गावच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-पोटाच्या ऑपरेशनकरिता केली बचत, उंदरांनी कुरतडल्या 2 लाखांच्या नोटा

उमर गौतम मुख्य सुत्रधार

उमर गौतमच्या इस्लामिक दावा सेंटरने केलेल्या धर्मांतरात उत्तर प्रदेशच्या एटीएसद्वारे उत्तर प्रदेशातील लोकांचीदेखील पडताळणी केली जात आहे. इस्लामिक दावा सेंटरच्या खात्यांची चौकशी केली असता 1 कोटी 82 लाख 83, 210 रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जेव्हा एटीएसकडून उमर गौतमच्या खात्यांची चौकशी केली गेली तेव्हा फातिमा चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात जमा केलेली रक्कम त्यांनी वैयक्तिकरित्या वापरल्याचे उघड झाले. इस्लामिक दावा सेंटर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या खात्यात एक कोटी ८२ लाख ८३ हजार २१० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याचबरोबर परदेशातूनही 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामध्ये रियाध, कतार आणि अबू धाबी देशांचा समावेश आहे. तीच रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली जात असल्याचेही आढळले आहे.

हेही वाचा-अमेरिकेत आढळला दुर्मीळ मंकीपॉक्स रोग; नायजेरियाहून आलेल्या प्रवाशाला लागण

मोहम्मद उमर या धार्मिक गुरूंच्या माध्यमातून मूक-बधिर विद्यार्थ्यांना ब्रेनवॉश करायचा. सुरक्षा एजन्सी या धार्मिक नेत्यांच्या कॉल डिटेल रिपोर्ट, सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटी शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून धर्मगुरू धर्मांतराबद्दल कोणाशी बोलत असत याबाबत माहिती मिळवता येईल. गेल्या आठ महिन्यांत त्याच्या वतीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची तपासणीही केली जात आहे. धर्म परिवर्तन प्रकरणात अटक केलेले उमर गौतम आणि जहांगीर आलम यांची एटीएसची चौकशी सुरू आहे. देशातील 24 राज्यात ओमरचे नेटवर्क पसरल्याचा दावा केला जात आहे. एटीएस याची पडताळणी करीत आहे. उमर यांनी नमूद केलेले पत्ते शोधण्यासाठी यूपी पोलीस संबंधित राज्यातील पोलिसांना याबाबत माहिती देत आहेत, असे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी नुकतेच सांगितले आहे.

Last Updated : Jul 17, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.