ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतरणाचे रॅकेट; एटीएसकडून दोन आरोपींना अटक - lucknow news

पोलिसांनी नवी दिल्ली येथून मुफ्ती काझी जहांगीर और मोहम्मद उमर या संशयित आरोपींना अटक केली आहे. एटीएसकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

UP ATS
उत्तर प्रदेश एटीएस
author img

By

Published : Jun 21, 2021, 4:44 PM IST

लखनौ - उत्त प्रदेश पोलिसांनी धर्मांतरण करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर धर्मांतरणाचे रॅकेट चालविण्याच आरोप आहे.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुवव्यस्था) प्रशांत कुमार म्हणाले, की राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचे रॅकेट सुरू आहे. आजतागायत एक हजार मुकबधीर आणि महिलांचे धर्मांतरण करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतरण होत असल्याची माहिती सातत्याने एटीएसला मिळत होती. मुकबधीर विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या पीडीत मुलांना नोकरी, लग्नाचे आश्वासन देऊन धर्मांतरण करण्यात येत होते. त्यासाठी आयएसआयसह विदेशांमधून निधी पुरविण्यात येत होता, असे कुमार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतरणाचे रॅकेट

हेही वाचा-कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तीव्र असण्याची शक्यता- आयआयटी कानपूर

११७ मुकबधीरांचे धर्मांतरण

पोलिसांनी नवी दिल्ली येथून मुफ्ती काझी जहांगीर और मोहम्मद उमर या संशयित आरोपींना अटक केली आहे. एटीएसकडून त्यांची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर येथील नोएडा डीफ सोसायटीमधील ११७ मुकबधीरांचे धर्मांतरण करण्यात आले आहे.

हेही वाचा-सरकारविरोधात आंदोलनाकरिता काँग्रेस करणार नियोजन; सोनिया गांधींनी २४ जूनला बोलाविली बैठक

स्वेच्छेने धर्मांतरण करून विवाह करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे त्यांची बांधिलकी

धर्मांतरण करुन विवाह करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान कताना धर्मांतरण हा महत्त्वाचा मुद्दा नाही. जबरदस्ती धर्मांतरणाचा आरोप नसेल तर अशा प्रेमी युगुलाला सुरक्षा प्रदान करणे, ही पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने जूनमध्ये दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, जर दोन बालिक आपल्या इच्छेने लग्न करत असतील, नाही जरी केले असेल आणि सोबत राहत असतील, इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र नसले तरी अशा जोडप्याला पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षा प्रदान करणे त्यांची बांधिलकी आहे. पोलिसांनी अशा जोडप्याला प्रमाणपत्रासाठी जबरदस्ती करू नये, असे आदेश न्यायाधीश सलिल कुमार राय यांनी जूनमध्ये दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.