ETV Bharat / bharat

Unique Wedding In Himachal : नवरदेवाच्या घरी नवरी पोहोचली वरात घेऊन, हिमाचलमधील अनोखी जाजडा प्रथा नेमकी आहे तरी काय?

author img

By

Published : Jan 28, 2023, 9:10 PM IST

हिमाचल प्रदेशात आजही पारंपरिक अनोख्या प्रथेचे पालन करण्यात येते. त्यातील एक जाजडा प्रथा ही सुपरिचित आहे. या प्रथेनुसार नवरी नवरदेवाच्या घरी वरात घेऊन जाते. त्यानंतर लग्नाचे सगळे विधी नवरदेवाच्या घरीच पार पाडले जातात. विशेष म्हणजे नवरदेवाला कोणताही हुंडा दिला जात नाही. राजेंद्र पांडे आणि सूमन जोशी यांचे जाजडा प्रथेनुसार लग्न पार पडले. वाचा त्याविषयी खास ईटीव्ही भारतचा रिपोर्ट.

Unique Wedding In Himachal
वरात घेऊन पोहोचलेली सुमन जोशी
वरात घेऊन पोहोचलेली सुमन जोशी

सिरमौर : हिमाचल प्रदेश आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जगप्रसिद्ध आहे. त्यासह हिमाचल प्रदेशात असणाऱ्या प्रथा आणि अनोख्या प्रथामुळेंही सुप्रसिद्ध आहे. त्यातीलच जाजडा प्रथा ही अनोखी प्रथा अद्यापही हिमाचल प्रदेशात अस्तित्वात आहे. हाटी समुदायात असलेल्या या प्रथेत नवरी नवरदेवाच्या घरी वरात घेऊन जाते. नवरदेवाच्या घरीच लग्नाच्या सगळ्या विधी साजऱ्या करण्यात येतात. त्यामुळे भारतातील मातृसत्ताक पद्धीतीचे हिमाचल प्रदेशात अद्यापही जतन केले जाते. त्याविषयी जाणून घेऊया ईटीव्ही भारतच्या या खास लेखात.

Unique Wedding In Himachal
वरात घेऊन पोहोचलेली सुमन जोशी

नवरदेवाच्या घरी वरात घेऊन गेली नवरी : सिरमौर जिल्ह्यात हाटी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. यातील शिलाई उपमंडळातील कुसेनू गावातील राजेंद्र पांडे या तरुणाचे लग्न उत्तराखंडमधील चकराता गावातील सुमन जोशी या तरुणीसोबत ठरले होते. त्यामुळे सुमन आपल्या खास 100 पाहुण्यांसोबत कुसेनू गावात राजेंद्रच्या घरी वरात घेऊन गेली. त्यानंतर तेथेच लग्नाच्या सगळ्या विधी साजऱ्या करण्यात आल्या. हाटी समुदायात अद्यापही मुलगी मुलाच्या घरी वरात घेऊन लग्नासाठी जात असल्याची परंपरा राखली जाते. त्यामुळे या अनोख्या लग्नाची चर्चा तर होणारच. नवरदेवाचे वडील कुंभराम पांडे यांनी यावेळी जाजडा परंपरेत नवरदेव वरात घेऊन नवरीकडे जात नसल्याचे सांगत, सगळ्या विधी नवरदेवाच्या घरीच पार पडत असल्याचे सांगितले. या अनोख्या लग्नात सगळ्या परंपरागत रितीरिवाजाचे पालन करत हा लग्न सोहळा साजरा करण्यात आला.

Unique Wedding In Himachal
वरात घेऊन पोहोचलेली सुमन जोशी

प्राचिन काळापासून सुरू आहे जाजडा प्रथा : जाजडा प्रथा ही प्राचिन काळापासून सुरु असल्याची माहिती हाटी समितीचे उपाध्यक्ष तथा वकील सुरेंद्र सिंह ठाकूर यांनी यावेळी सांगितले. गिरिपार परिसरातील परंपरा आणि सामाजिक रितिरिवाज प्राचिन काळापासून पालन केले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यामागे कोणतीही कहाणी नाही, तर पुर्वजांची देण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र काळानुरुप आता या प्रथेनुसार लग्न कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Unique Wedding In Himachal
वरात घेऊन पोहोचलेली सुमन जोशी

अनोखी आहे जाजडा प्रथा : जाजड प्रथेनुसार लग्नात होणारा सारा खर्च हा नवरदेवालाच करावा लागत आहे. त्यासह या प्रथेनुसार लग्न करताना कोणताही हुंडा वरपक्षाला देण्यात येत नाही. लग्नाच्या वेळेस सगळा स्वयंपाक गावातील महिलाच बनवतात. मात्र त्यांना पीठ मळून देण्याचे काम गावातील पुरुषांना करावे लागते. भाजी कापणे, बनवण्याचे काम पुरुषांना करावे लागते. महिलांकडे फक्त चपात्या बनवण्याचे काम देण्यात येते. त्यासाठी त्यांना ताट भरुन गावरान तूप भेट देण्यात येते. लग्नाच्या दिवशी पीठ मळणाऱ्या पुरुषांना वेगळ्या पार्टीचे आयोजन करण्यात येते. त्यांच्यासाठी लग्नात नाटी देण्यात येते.

नवरदेवाला सोबत घेऊन जाते नवरी : आपल्याकडे लग्न लागल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी जाते. मात्र जाजडा परंपरेत नवरदेव आपल्या काही मोजक्या पाहुण्यांसह नवरीच्या घरी जातो. नवरीच्या गावात गेल्यानंतर त्यांच्यासाठी खास पाहुणचार करण्यात येतो. त्यानंतर दोन दिवसांच्या पाहुणचारानंतर नवरी आपल्या सासरी परत येते. मात्र नवरीकडून कोणत्याही प्रकारचा हुंडा यावेळी घेण्यात येत नाही. गिरीपार परिसरात या प्रथेचे पालन करण्यात येते. मात्र आता अशाप्रकारचे लग्न कमी होत असल्याचे सुरेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

हिमाचलचा नवरदेव उत्तराखंडची नवरी : हिमाचल प्रदेशातील गिरिपार आणि उत्तराखंडमधील जौनसार बावर परिसरात भौगोलिक, सांस्कृतीक पारंपरिक खाणे पिणे सारखेच आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील नवरदेव आणि उत्तराखंडमधील नवरीचे लग्न जाजडा परंपरेनुसार होऊ शकले. त्यातही विशेष म्हणजे जौनसार बावर परिसराला भारत सरकारने 1967 साली अनुसूचित जनजाती परिसरर घोषित केले आहे. मात्र हिमाचलच्या गिरिपार परिसराला अद्याप हा दर्जा मिळाला नाही. 2022 केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या परिसराला जनजाती दर्जा देण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. याबाबत गेल्या पाच दशकापूसन गिरिपार परिसराला जनजाती परिसराचा दर्जा देण्याची नागरिक मागणी करत आहेत. केंद्रीय हाटी समितीचे महासचिव कुंदन सिंह शास्त्री यांनी जाजडा प्रथा गिरिपारच्या आदिवासी परिसराची परंपरा आहे. ही प्रथा हाटी समुदायाच्या एथनोग्राफिक रिपोर्टमध्येही असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - jihadi Education In Madrassa : मदरशात दिले जाणारे जिहादी शिक्षण हे मोठे आव्हान - आसाम पोलीस महासंचालक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.