ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांची घोषणा.. पोलीस पदकांवरील शेख अब्दुल्लांची प्रतिमा हटविणार, त्याजागी राष्ट्रीय चिन्हे लावणार

author img

By

Published : May 25, 2022, 9:55 AM IST

केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये ( Union Territory of Jammu Kashmir ) उपराज्यपालांनी पोलीस पादकांवरील ( Jammu Kashmir Police Medal ) शेख अब्दुल्ला यांची प्रतिमा हटविण्याचा निर्णय घेतला ( Replace Embossed Image Of Sheikh Abdullah ) आहे. त्याजागी राष्ट्रीय प्रतीकांची चिन्हे लावण्यात येणार आहे.

sheikh abdullah
शेख अब्दुल्ला

जम्मू : दिग्गज काश्मिरी नेते शेख मुहम्मद अब्दुल्ला यांची पोलीस पदकांवर असलेली नक्षीदार प्रतिमा बदलण्याची ( Replace Embossed Image Of Sheikh Abdullah ) घोषणा केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरने ( Union Territory of Jammu Kashmir ) केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील लेफ्टनंट गव्हर्नर प्रशासनाने दिग्गज काश्मिरी नेते शेख मुहम्मद अब्दुल्ला यांच्या नक्षीदार प्रतिमेच्या जागी शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रीय चिन्हे असलेली पोलीस पदके देण्याची घोषणा केली ( Jammu Kashmir Police Medal ) आहे.

कोण आहेत शेख अब्दुल्ला ( Who Is Sheikh Abdullah ) : या पुरस्कारांना आधी शेर-ए-काश्मीर पोलीस पदके असे संबोधले जात होते, परंतु प्रशासनाने त्यांना जम्मू आणि काश्मीर पोलीस पदके असे नाव दिले होते. शेर-ए-काश्मीर किंवा काश्मीरचा सिंह ही पदवी शेख मुहम्मद अब्दुल्ला यांना काश्मीरच्या जनतेने निरंकुश शासनाविरुद्ध लढल्याबद्दल दिलेली होती. शेख अब्दुल्ला यांनी 1947 ते 1953 पर्यंत पंतप्रधान म्हणून आणि नंतर 1977 ते 1982 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत दोनदा मुख्यमंत्री म्हणून जम्मू-काश्मीरवर राज्य केले. ते 1939 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक होते.

नव्या पदकावर 'हे' असणार : भारत सरकारच्या राष्ट्रीय चिन्हाने शेख अब्दुल्लांची प्रतिमा बदलली जाईल. जम्मू आणि काश्मीर राज्य चिन्हासह शौर्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलीस पदक आणि शौर्य/मेरिटोरियस मेडलच्या बाबतीत जम्मू आणि काश्मीर पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस असे लिहिलेले असेल. असे वित्त आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव राज कुमार गोयल यांनी ताज्या आदेशात म्हटले आहे. नॅशनल कॉन्फरन्सने हा निर्णय जम्मू-काश्मीरचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रशासनाचा आणखी एक प्रयत्न असल्याचे वर्णन केले आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि पूर्वीच्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्याने प्रशासनाने शेख अब्दुल्ला यांच्या वाढदिवसाचे (५ डिसेंबर) सुट्टीचे दिवसही संपवले. भाजपने याचे स्वागत केले आहे. शेख अब्दुल्ला यांचे नाव अधिकृत समारंभ आणि रेकॉर्डमधून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : अफगाणिस्तानात बघा, काय झालं? मेहबुबा मुफ्तींचा केंद्राला थेट इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.