नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारापूर्वी आज केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र दिसून आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद आणि केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे हे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.
केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री देवश्री चौधरी यांनीही राजीनामा दिला आहे. केंद्रीय कामगार मंत्री गंगवार यांच्या कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारी होती. केंद्रीय मंत्री गंगवार यांनी राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोणती जबाबदारी दिली जाणार, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
-
The President of India accepts resignation of 12 members of the Council of Ministers including IT Minister Ravi Shankar Prasad, Environment Minister Prakash Javadekar, Health Minister Harsh Vardhan, Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank and others: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/mNbP2V3lhn
— ANI (@ANI) July 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The President of India accepts resignation of 12 members of the Council of Ministers including IT Minister Ravi Shankar Prasad, Environment Minister Prakash Javadekar, Health Minister Harsh Vardhan, Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank and others: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/mNbP2V3lhn
— ANI (@ANI) July 7, 2021The President of India accepts resignation of 12 members of the Council of Ministers including IT Minister Ravi Shankar Prasad, Environment Minister Prakash Javadekar, Health Minister Harsh Vardhan, Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank and others: Rashtrapati Bhavan pic.twitter.com/mNbP2V3lhn
— ANI (@ANI) July 7, 2021
पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी या मंत्र्यांचा स्वीकारला राजीनामा
- केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा
- केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री देवश्री चौधरी
- केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार
- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल
- केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन
- केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद
- केंद्रीय सामाजिक न्यााय मंत्री थावरचंद गहलोत
- केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री अंबाला रतन लाल कटारिया
- केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबी
- केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी
- रिपोर्टनुसार केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा व केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री, दुग्धोत्पादन आणि मत्स्योद्योग यांनीही राजानीमे दिले आहेत.
- या यादीत भाजपचे खासदार आणि केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री संजय धोत्रे आणि अंबाला रतन लाल कटारिया यांचाही समावेश आहे.
- केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडे वन्न आणि हवामान बदल विभागाची जबाबदारी होती. सुप्रियो यांनीदेखील राजीनामा दिला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबी यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा-LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : मुंडे भगिनी नाराज? ट्विट करून दिली मुंबईत असल्याची माहिती
हे नेते दिल्लीत दाखल-
मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असलेले देशभरातील अनेक नेतेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यात काँग्रेसमधून भाजपत आलेले ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पशुपती पारस, वरुण गांधी, आरसीपी सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय मध्यप्रदेशातून राकेश सिंह, यूपीतून अपना दलच्या अनुप्रिया पटेल, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तराखंडमधून माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, अनिल बलुनी, बिहारमधून सुशील मोदी, आरसीपी सिंह, लल्लन सिंह यांचेही नाव चर्चेत आहे.
दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. या विस्तारात नवीन आणि तरुण चेहऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संधी देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : 43 नेते आज पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता