ETV Bharat / bharat

Goa Election 2022 : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाची अखेर निवडणुक रिंगणातून माघार

कुंभारजूवे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाने अखेर माघार घेत मतदारसंघात पुन्हा एकदा काम करण्याचे ठरवले आहे. (Union Minister Shripad Naik') दरम्यान, गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
author img

By

Published : Jan 29, 2022, 2:13 AM IST

Updated : Jan 29, 2022, 2:35 AM IST

गोवा (पणजी) - कुंभारजूवे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाने अखेर माघार घेत मतदारसंघात पुन्हा एकदा काम करण्याचे ठरवले आहे.(Union Minister Shripad Naik) दरम्यान, गोवा भाजपचे (Union Minister Shripad Naik) प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे.

भाजपची डोकेदुखी अधिकच वाढली

मडकाई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सिद्धेश नाईक उत्सुक होते. मात्र, भाजपने येथील आमदार पांडुरंग माडकाईकर यांच्या पत्नीला तिकीट दिल्यामुळे सिद्धेश यांचा पत्ता कट करण्यात आला. (Goa Election 2022) त्यामुळे नाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. त्यामुळे भाजपची डोकेदुखी अधिकच वाढली होती.

सिद्धेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात होते

जिल्हा परिषद सदया असलेले सिद्धेश नाईक यांनी मागच्या काही दिवसापासून मतदारसंघात कामे सुरू केले होते. मात्र, तिकीट कोणाला मिळणार याबद्दल अधिकच उत्सुकता होती. त्यातच भाजपने या मतदारसंघातील उमेदवार बुधवारी दुपारी घोषीत केल्यामुळे उत्सुक उमेदवारांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. अखेर भाजपने सर्वांना धक्का देत आमदार पांडुरंग मदकाईकर यांची पत्नी जेनिता मडकाईकार यांना उमेदवारी घोषीत केल्यामुळे नाराज झालेल्या सिद्धेश नाईक यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. पण पक्षाने त्यांची नाराजी दूर केल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी सांगितले.

सिद्धेश नाईक यांना सचिव पदी बोळवण पण पणजी आणि मांद्रेत डोकेदुखी वाढली

नाराज असलेल्या सिद्धेश नाईक यांना राज्याच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र भाजपला पणाजितून उत्पल पर्रीकर आणि मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे यांचे बंड थोपवण्यात भाजपला अपयश आले आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ॲमेझॉनची सहकार्य करणार?, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Last Updated : Jan 29, 2022, 2:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.