अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या ( Gujarat Assembly Elections ) दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. ( Amit Shah voting In Naranpur ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांनी नारणपूरमधून मतदान केले. अमित शाह नारणपुरा येथील उप-विभागीय कार्यालयात पोहोचले. अमित शाह यांनी कुटुंबासह मतदान केले. अमित शहा यांचा मुलगा जय शाह, पत्नी आणि सून यांच्यासोबत मतदान केले. कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मतदान केल्यानंतर अमित शाह दर्शनासाठी मंदिरात पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे, अशा स्थितीत अनेक दिग्गजांनी मतदान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी नारणपूरला पोहोचले. यादरम्यान त्यांची पत्नी आणि मुलगा जय शाह एकत्र पोहोचले आणि त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
-
गुजरात: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने अहमदाबाद में अपना वोट डाला। #GujaratElections pic.twitter.com/RxKQadESbW
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">गुजरात: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने अहमदाबाद में अपना वोट डाला। #GujaratElections pic.twitter.com/RxKQadESbW
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022गुजरात: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने अहमदाबाद में अपना वोट डाला। #GujaratElections pic.twitter.com/RxKQadESbW
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदान केले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनीही आपल्या पत्नींसह गुजरातमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या महान उत्सवाला हातभार लावला.सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची गर्दी दिसून येत आहे. यासोबतच कडाक्याच्या थंडीतही मतदानासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.