पणजी- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून वित्त मंत्रालय 6 ते 12 जून ह्या कालावधीत, आयकॉनिक आठवडा ( celebrating Iconic Week ) साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यात आज ( Independence Day celebrations ) हा कार्यक्रम झाला. हा राष्ट्रार्पण सोहळा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात, केंद्रीय अर्थमंत्री निर्माल सीतारामन हे संग्रहालय ज्या इमारतीत आहे, त्या 400 वर्षे जुन्या वास्तूमध्ये स्थापन असलेल्या, एकाच दगडातून बनवण्यात आलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकावून हे उद्घाटन केले.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी ( Finance Pankaj Chaudhary ) आणि गोव्याचे वाहतूक, पर्यटन आणि पंचायत राज मंत्री मॉउवीन गुडीन्हो यावेळी उपस्थित होते. धरोहर’ हे भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू संग्रहालय ( Panchayat Raj Mouvin Gudinho) आहे. जिथे भारतीय सीमाशुल्क विभागाने, तस्करी, चोरी होत असतांना जप्त केलेल्या देशातल्या प्राचीन मूर्ती आणि इतर स्थापत्य वस्तू तर ठेवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, देशाच्या आर्थिक आघाड्यांचे, देशाच्या वारशाचे, सौंदर्याचे आणि समाजाचे रक्षण करताना, भारतीय सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवायांची माहिती देखील इथे बघायला मिळेल. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे. दुमजली निळ्या इमारतीचे आधीचे, म्हणजे पोर्तुगीज काळातील नाव ‘अल्फांडेगा’ असे होते. गेल्या 400 वर्षांपासून ही इमारत मांडवी नदीच्या काठी उभी आहे.
हेही वाचा-Modi Bhagwat Poster on Auto : ऑटोवर नरेंद्र मोदींचा आणि मोहन भागवतांचा फोटो लावणाऱ्या तरुणावर हल्ला
हेही वाचा-Ranchi Violence : रांचीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर 144 कलम लागू, रांचीत भीतीचे वातावरण