ETV Bharat / bharat

तब्बल नऊ गोळ्या लागूनही जगला 20 वर्षे, जाणून घ्या कोण होता 'तो' - प्रेम प्रकाश सिंह

शरिरात 9 गोळ्या लागल्यानंतर मृत घोषित झाल्यानंतरही जिवंत राहीला. हृदयाजवळ एक गोळी अडकूनही 20 वर्षे जीवंत राहिला. ज्याने स्वतःच्या काकाची हत्या केली होती. इतकेच नाही तर एका आमदारासह त्यांच्या गाडीत असलेल्या सह जणांना एके 47 ने गोळीबार करून संपवले होते. पोलिसांच्या हातात तुरी देऊनही निवडणुकीच्या मैदाना उतरला. अशा एका कुख्यात गुंडाची कहाणी वाचा....

न
author img

By

Published : Apr 6, 2022, 5:57 PM IST

Updated : Apr 6, 2022, 8:00 PM IST

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) - प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगी ( Munna Bajrangi ) नावाच्या कुख्यात गुंडाने वयाच्या 14 व्या वर्षी पहिली हत्या केली होती तीही स्वतःच्या काकाची. एक काळ असा होता की मुन्ना बजरंगीच्या नावाची दहशत संपूर्ण पूर्वांचलमध्ये होती. त्याला गजराज सिंह या कुख्यात गँगस्टरचा वरदहस्त मिळाल्यानंतर तो आणखी निर्दयी झाला.

तब्बल नऊ गोळ्या लागूनही होता जिवंत

नव्वदच्या दशकात जेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी व बहुजन समाज पक्ष आपले पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न करत होते. त्यावेळी गुन्हेगारीही फावत चालली होती. राजा भैया, बृजभूषण शरण सिंह, डीपी यादव, मुख्तार अंसारी, अतीक अहमद यांसारख्या माफिया डॉनचा त्यावेळी गुन्हेगारी जगतात बोलबाला होता. मुन्ना बजरंगी सारख्या गुन्हेगारांनाही गुन्हेगारी जगतात आपले नाव मोठे करण्याची संधी मिळाली. त्याने एकामागेएक अनेक गुन्हे करत गुन्हेगारी जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

कसा झाला प्रेम प्रकाशचा मुन्ना बजरंगी? - 1967 मध्ये जौनपूरच्या दयाल गावात जन्मलेला मुन्ना बजरंगी लहानपणापासूनच डॉन व्हायचे होते. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर प्रेम प्रकाश उर्फ मुन्ना बजरंगी हत्या, दरोडे, अपहरण यांसारखी गुन्हे करू लागला. जौनपूरच्या कारागृहात भाजपा नेता रामचंद्र व त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा खून केला होता. त्यानंतर 1996 साली मुख्तार अंसारी मऊ येथून आमदार म्हणून निवडून आल्याने मुन्ना बजरंगी त्यांच्यासोबत काम करू लागला. मुख्तार अंसारीसाठी तो हत्या, अपहरण खंडणी, असे गुन्हे करू लागला.

विधायक कृष्णानंद राय यांचा खून - मुन्ना बजरंगीने नोव्हेंबर, 2005 मध्ये भाजप आमदार कृष्णानद राय यांचा एके 47 ( AK 47 ) ने गोळीबार करून खून केला होता. त्या हत्याकांडमध्ये मुन्ना बजरंगीसोबत आणखी सहाजण होते. त्यांना एके 47 बंदुकीतून तब्बल 400 राउंड फायर करत कृष्णनंद राय यांच्यासह त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीत असलेल्या इतर सहा जणांचाही खून केला होता. मुख्तार अंसारी व कृष्णानंद राय यांच्यातील संघर्षामुळे त्यने हे हत्याकांड केले होते. 2002 च्या निवडणूकीत कुख्यात गुंड बृजेश सिंहच्या मदतीने कृष्णानंद राय यांनी मुख्तार अंसारी यांचे भाऊ अफजल अंसारी यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोघांमध्ये संघर्ष आणखी पेटला.

Most Wanted मुन्ना बजरंगी - आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्याकांडानंतर पोलिसांसह राज्य सरकारही हादरली होती. मुन्ना बजरंगी यूपी पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत सर्वात वर होता. त्यापूर्वी 1998 साली मुन्ना बजरंगीने मृत्यूशी दोन हात केले होती. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स ( STF ) ने त्यावेळचा माफिया डॉन प्रकाश शुक्ला याच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, त्या सापळ्यात प्रकाश शुक्ला ऐवजी मुन्ना बजरंगी अडकला होता.

मृत्यू दाढेतून कसा बाहेर आला मुन्ना बजरंगी ? - एसटीएफने प्रकाश शुक्लाऐवजी दूसऱ्या गुन्हेगारांचे फोन टॅपिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यातून एसटीएफला माहिती मिळाली की, 50 हजार रुपयांचा बक्षिस असलेला कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शस्त्र पुरणाऱ्या अनेकांच्या संपर्कात आहे. एसटीएफ माहिती मिळाली की, आर्म्स डीलर हितेंद्र गुर्जर याच्यासोबत मुन्ना बजरंगी हरिद्वारहून उत्तर प्रदेशला येत आहे. त्यानुसार एसटीएफने 3 पथके तयार केली. एक पथक हरिद्वारपासून मुन्ना बजरंगीचा पाठलाग करत होते तर इतर दोन पथके सापळा लावून त्याची वाट पाहत होते.

11 सप्टेंबर, 1998 रोजी दिल्लीच्या समयपूर बादली येथे एका पेट्रोल पंपाजवळ एसटीएफच्या पथकाने हितेंद्र आणि मुन्ना बजरंगी याला अडवले. एसटीएफ व मुन्ना बजरंगी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत मुन्ना बजरंगीला 9 आणि हितेंद्रला दोन गोळ्या लागल्या. चकमकीत दिल्ली पोलिसांच्या एका शिपायालाही गोळी लागली होती. एन्काउन्टरमध्ये मुन्ना बजरंगी व हितेंद्र गुर्जर गोळी लागल्याने निपचित पडले होते. एसटीएफच्या पथकाने हितेंद्र व मुन्नाची नाडी तपासली त्यावेळी दोघेही ठार झाल्याचे त्यांना कळाले. पण, औपचारिकता पार पाडण्यासाठी दोघांना राम मनोहर लोहिया संस्थान या रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी हितेंद्र व मुन्ना बजरंगी दोघांना मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह रुग्णालयातील शवाघरात शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आले. पण, काही वेळाने शवाघारातून एक वार्ड बॉय मुन्ना बजरंगीला स्ट्रेचवर टाकून धावत आला. तो म्हणाला, मुन्ना बजरंगी जिवंत असून तो श्वास घेत आहे. त्यानंतर तत्काळ मुन्ना बजरंगीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या शरिरातून 8 गोळ्या काढल्या. पण, एक गोळी हृदयाजवळ अडकली होती. मुन्नाला ज्यावेळी जाग आली त्यावेळी डॉक्टरांनी त्याला याबाबत माहिती दिली. तसेच ही गोळी काढल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असेही सांगितले. पण, मुन्नाने ती गोळी काढू नये, असे सांगितले. त्यानंतर तब्बल 20 नंतर मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर झालेल्या शवविच्छेदनात डॉक्टरांना ती गोळी मिळाली.

निवडणुकीच्या मैदानात मुन्ना बजरंगी - मृत्यूशी दोन हात कलेल्या मुन्ना बजरंगीच्या वागणुकीत काहीच बदल झाले नव्हते उलट त्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला. एकेकाळी राजकीय नेत्यांसाठी काम करणारा मुन्ना बजरंगी 2012 स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरला. मात्र, तो निवडून आला नाही. तरीही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्याने इतके गुन्हे केले की एकेकाही 50 हजार रुपयांचे बक्षिस असलेल्या मुन्ना बजरंगीवरील बक्षिसाची रक्कम 7 लाखांपर्यंत करण्यात आली. होती.

कसा संपला मुन्ना बजरंगी ? - पोलिसांच्या हातात तुरी देऊन फिरणाऱ्या मुन्ना बजरंगीच्या मुसक्या 2009 मध्ये मुंबईतील मलाड येथील सिदि्धविनायक सोसायटीतून आवळण्यात पोलिसांना यश आले. त्या ठिकाणी तो प्रेम प्रकाश सिंह नावाने आपल्या पत्नी व तीन पाल्यांसह राहत होता. 8 जुलै, 2018 ला मुन्ना बजरंगीला उत्तर प्रदेश पोलिसांनी झांशी कारागृहात आणले होते, दुसऱ्या दिवशी त्याला बागपत कारागृहात हलविण्यात आले. पण, 9 जुलैला सुनील राठी या कुख्यात गुंडाने मुन्ना बजरंगीच्या डोक्यात 10 गोळ्या मारुन त्याची हत्या केली. सुमारे तीन दशकांपासून गुन्हेगारी जगतात धुमाकूळ घालणाऱ्या माफिया डॉनच्या खात्म्यानंतर सामान्य नागरिकांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

महत्त्वाच्या व विश्वसनीय बातम्यांसाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत अॅप

Last Updated : Apr 6, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.