ETV Bharat / bharat

Delhi Warehouse Collapsed : दिल्लीत बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली.. ६ कामगारांचा मृत्यू

दिल्लीत आज एक बांधकाम सुरु असलेल्या गोदामाची इमारत कोसळल्याने ( Under construction warehouse collapsed ) सहा मजुरांचा मृत्यू झाला ( Six Died In Building Collapsed ) आहे. याठिकाणी २० ते २५ कामगार काम करत होते. याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

Delhi Warehouse Collapsed
दिल्लीत बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली.. ६ कामगारांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 15, 2022, 2:56 PM IST

Updated : Jul 15, 2022, 5:09 PM IST

नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात शुक्रवारी दुपारी एक गोदाम ( Under construction warehouse collapsed ) कोसळले. येथे काम करणारे सुमारे 13 मजूर त्यात अडकले. यामध्ये ५ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असली तरी अद्याप आकडा स्पष्ट झालेला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि अग्निशमन दलाने 11 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात नेले.

ढिगारा हटवण्याचे काम सुरु : अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलीपूरच्या बकोली गावात गोदाम कोसळल्याचा फोन आला. पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक चौहान धरम कांताजवळील या गोदामात पोहोचले तेव्हा तेथे अनेक लोक घराखाली दबले असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. त्याखाली 20 हून अधिक लोक दबले असल्याची माहिती त्यांना मिळाली.

दिल्लीत बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली.. ६ कामगारांचा मृत्यू

११ जणांना काढले बाहेर : वृत्त लिहिपर्यंत अग्निशमन विभागाने 11 जणांना बाहेर काढले होते. प्राथमिक तपासात हे गोदाम सुमारे ५ हजार यार्डात बांधल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये बांधकाम सुरू असताना भिंत उभारण्याचे काम सुरू होते. सध्या जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, नंतर पोलिस चौकशीत येथे 13 मजूर काम करत असल्याचे निष्पन्न झाले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर आठ जखमी मजुरांवर उपचार सुरू आहेत.

बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर : याठिकाणी सुरू असलेले बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून ते बंद करण्याच्या सूचनाही पालिकेने दिल्या होत्या. मात्र असे असतानाही येथे हे बांधकाम सुरू असल्याने अनेक मजूर गाडले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक लोकांनी डीएम कार्यालयात अवैध बांधकामाची माहिती दिली होती.

हेही वाचा : building collapsed in mumbai : मागील काही वर्षातील प्रमुख घटना

Last Updated : Jul 15, 2022, 5:09 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.