लखनऊ ( उत्तरप्रदेश ) : Lucknow Wall Collapsed लखनौमध्ये कँट परिसरातील दिलकुशाजवळ बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अनेक जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना तातडीने बाहेर काढण्यात येत आहे. एनडीआरएफला दिलाकुशामध्ये मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देशही दिले आहेत. यासोबतच सीएम योगींनी जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
बातमी अपडेट होत आहे