ETV Bharat / bharat

आजपासून नवीन धडा शिकला... उमा भारतींकडून असंयमी भाषेबद्दल माफी - ओबीसी प्रतिनिधी बैठक उमा भारती निवासस्थान

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. आपण यामधून नवा धडा शिकल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उमा भारती
उमा भारती
author img

By

Published : Sep 20, 2021, 9:16 PM IST

भोपाळ - भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी असंयमी भाषेबद्दल माफी मागितली आहे. नोकरशाही आमची चप्पल उचलते, असे विधान केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी सारवासारव करणारे ट्विट केले आहे.

भाजपच्या नेत्या उमा भारती म्हणाल्या, की मला दु:ख आहे. मी असंयमी भाषेचा वापर केला, मात्र भावना चांगली होती. मोजक्या लोकांमध्ये अनौपचारिक बोलतानाही भाषा सुधारून वापरावी, हा धडा मी आजपासून शिकला आहे. प्रामाणिक नोकरशाही ही सत्तेत असलेल्या सामर्थ्यवान, सत्य आणि चांगला उद्देश असलेल्या नेत्यांना पाठिंबा देते. असा माझा अनुभव आहे. ती बैठक अनौपचारिक होती, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा-राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

उमा भारतींनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत नोकरशाहीला कमी लेखत टीका केली होती. या बैठकीत ओबीसींच्या प्रतिनिधींनी जातिनिहाय लोकसंख्येची व खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली होती. जर निर्णय घेतला नाही तर, आंदोलन करू, असा या प्रतिनिधींनी इशाराही दिला आहे.

हेही वाचा-अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

उमा भारती यांनी हे केले वादग्रस्त वक्तव्य

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. नोकरशाहीला ही नेत्यांची चप्पल उचलणारी असते, अशी टीका केली. त्याचबरोबर, नोकरशाहीद्वारे नेत्यांना फिरवले जाते, या प्रश्नावर विचारले असता, या फालतू गोष्टी आहेत, नोकरशाहीची योग्यता काय आहे? नोकरशाही नेत्यांना फिरवत नाही तर, एकट्यात चर्चा होते. त्यानंतर पुन्हा नोकरशाही फाइल बनवून घेऊन येते, असे उमा भारती म्हणाल्या आहेत.

हेही वाचा-उमा भारती बरळल्या, म्हणाल्या नोकरशाहीची काही औकात नाही, नेत्यांची चप्पल उचलते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.