ETV Bharat / bharat

UK PM Visit Sabarmati : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे गुजरातमध्ये जंगी स्वागत; साबरमती आश्रमात दिली भेट

author img

By

Published : Apr 21, 2022, 5:05 PM IST

बोरिस जॉन्सन यांचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनात औपचारिक ( Boris Johnson to visit Presidential Palace ) स्वागत केले जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ( Boris Johnson Narendra Modi visit ) चर्चा होईल. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ( Russia Ukraine issue ) या बैठकीला महत्त्व आहे. कारण आंतरराष्ट्रीय समुदाय आतापर्यंत रशियाला युद्धापासून रोखण्यात अपयशी ठरला आहे. ब्रिटीश उच्चायुक्तांच्या मते, पंतप्रधान जॉन्सन या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुक्त व्यापार करार (FTA) चर्चेतील प्रगतीवर चर्चा ( UK PM India meeting on FTA  ) करणार आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

अहमदाबाद - भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात पोहोचले. साबरमती आश्रमात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांनी चरखा फिरवला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. बोरिस जॉन्सन यांना साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या शिष्या मॅडलीन स्लेड ऊर्फ मीराबेन यांचे आत्मचरित्र 'द स्पिरिट पिलग्रिमेज' आणि 'गाइड टू लंडन' हे पुस्तक भेट देण्यात आले. मॅडेलीन स्लेड या ब्रिटिश रिअर-अॅडमिरल सर एडमंड स्लेड यांच्या कन्या होत्या.

तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळ ते शहरातील एका हॉटेलपर्यंत चार किलोमीटरच्या मार्गावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अहमदाबाद विमानतळावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पंतप्रधान जॉन्सन यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रीही उपस्थित होते. विमानतळावर आणि रस्त्यावर पारंपारिक गुजराती नृत्य आणि संगीत पथकांनी ब्रिटिश पंतप्रधानांचे स्वागत केले. विमानतळा बाहेर हा 'रोड शो' सुरू झाला. हा रोड शो आश्रमरोड, डफनाळा आणि रिव्हरफ्रंटमार्गे पार पडला.

या ठिकाणी बोरिस जॉन्सन देणार भेट-एअरपोर्ट सर्कल ते आश्रम रोडवरील पंचतारांकित हॉटेलपर्यंतचा चार किलोमीटरच्या रस्त्यावर 40 व्यासपीठ तयार करण्यात आले होते. पंतप्रधान जॉन्सन यांच्या स्वागतासाठी विविध 40 गटांनी पारंपारिक भारतीय नृत्य सादर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान जॉन्सन यांनी गुजरातच्या एक दिवसीय दौऱ्यात राज्यातील प्रमुख व्यावसायिकांशी बैठक घेतली आहे. त्यानंतर ते पंचमहाल जिल्ह्यातील हलोल जवळील ब्रिटीश कंपनी जेसीबीकडे रवाना झाले. त्यानंतर ते गांधीनगरमधील गुजरात बायोटेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी कॅम्पसला भेट देतील. हे विद्यापीठ ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठाच्या सहकार्याने उभारले जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान गुजरातचा दौरा संपवून नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी गांधीनगर येथील स्वामीनारायण पंथाच्या प्रसिद्ध अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची- बोरिस जॉन्सन यांचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनात औपचारिक ( Boris Johnson to visit Presidential Palace ) स्वागत केले जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ( Boris Johnson Narendra Modi visit ) चर्चा होईल. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ( Russia Ukraine issue ) या बैठकीला महत्त्व आहे. कारण आंतरराष्ट्रीय समुदाय आतापर्यंत रशियाला युद्धापासून रोखण्यात अपयशी ठरला आहे. ब्रिटीश उच्चायुक्तांच्या मते, पंतप्रधान जॉन्सन या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुक्त व्यापार करार (FTA) चर्चेतील प्रगतीवर चर्चा ( UK PM India meeting on FTA ) करणार आहेत. जॉन्सन हे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत.

2030 पर्यंतच्या रोडमॅपचाही आढावा घेणार- कोरोनामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा यापूर्वी दोनदा रद्द करण्यात आला होता. भारत आणि ब्रिटन यांच्यातील राजनैतिक आणि व्यापारी संबंधांना मोठा इतिहास आहे. 2021 मध्ये भारत-ब्रिटनमध्ये व्हर्च्युअल समिट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दोन्ही देशांमधील व्यवसाय वाढविण्यासाठी धोरणात्मक भागीदारी करण्यावर सहमती झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन 2030 पर्यंतच्या रोडमॅपचाही आढावा घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बैठकीत भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरही चर्चा होईल. याआधी मार्चमध्ये दोन्ही पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.

हेही वाचा-Share Market Today : शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सची 421 तर निफ्टीमध्ये 98 अंकांची उसळी

हेही वाचा-SC on Jahangirpuri Demolition : जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी बंदी

हेही वाचा-Social Harmony in Karnatak : सहा वर्षाच्या मुलीचा रोजानिमित्त उपवास; हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.