ETV Bharat / bharat

Ujjain Rape Case : उज्जैन बलात्कार प्रकरण; ५ संशयित ऑटो चालक ताब्यात, तपासासाठी 'एसआयटी' स्थापन

Ujjain Rape Case : उज्जैनमध्ये बलात्काराच्या भीषण घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित ऑटो चालकांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेचं अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Ujjain Rape Case
Ujjain Rape Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 8:08 AM IST

पहा व्हिडिओ

उज्जैन (मध्य प्रदेश) : Ujjain Rape Case : २७ सप्टेंबरला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बलात्काराची भयंकर घटना उघडकीस आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर सध्या इंदूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता तिच्या आरोग्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. तिच्या शरीरात संसर्ग पसरतोय. मात्र, तिची प्रकृती बरी असून ती उपचारांना प्रतिसाद देत आहे, अशी माहिती तिच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

तपासासाठी 'एसआयटी' स्थापन : २७ सप्टेंबरला उज्जैनमध्ये बलात्काराची भीषण घटना समोर आली. नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर टाकून दिलं. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासासाठी 'एसआयटी' स्थापन करण्यात आली असून, एकूण २८ जणांचं पथक तपासात गुंतलं आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही आणि इतर पुरावे देखील तपासले जात आहेत. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५ ऑटो चालकांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. संशयित ऑटो चालकाला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना ऑटोच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले होते.

मुलगी रक्तानं माखलेल्या अवस्थेत फिरत होती : उज्जैनमध्ये सोमवारी एक १२ वर्षीय मुलगी इनर रिंग रोडवर रक्तानं माखलेल्या अवस्थेत फिरत होती. याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ही मुलगी अशा अवस्थेत ८ किलोमीटरचा प्रवास करून बडनगर रोडवर पोहोचली. तिथे दंडी आश्रमाचे आचार्य राहुल शर्मा यांनी तिला पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिचं अंग कपड्यानं झाकलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं.

मला आश्रमाच्या गेटपासून २० फूट अंतरावर एक अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. मी मुलीला मदत करण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिची भाषा समजू शकलो नाही. त्यानंतर मी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी केली आहे. - आचार्य राहुल शर्मा

कॉंग्रेसचा सरकारवर आरोप : आता या मुद्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसनं सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी काँग्रेस नेत्यांनी उज्जैनच्या प्रभारी शोभा आहुजा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं पोलीस नियंत्रण कक्षाला घेराव घालून आरोपींच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या काळात महिलांवर अत्याचाराच्या अगणित घटना घडल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

हेही वाचा :

  1. Minor Girl Raped : उज्जैनमध्ये निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.