ETV Bharat / bharat

आता श्वास घ्यायलाही टॅक्स ! 'या' विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांना भरावा लागणार 'ऑक्सिजन कर'

author img

By

Published : Aug 3, 2021, 11:56 PM IST

Updated : Aug 4, 2021, 12:11 AM IST

उज्जैनमधील विक्रम विद्यापीठ परिसरात सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना आता कर भरावा लागणार आहे. इतकेच नाही तर जे विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेणार आहेत, त्यांनाही हा कर भरावा लागणार आहे.

-tax-for-oxygen-
-tax-for-oxygen-

उज्जैन - आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की, केवळ वस्तू व सेवा यावर कर आकारला जातो, परंतु उज्जैनमधील विक्रम विद्यापीठ परिसरात श्वास घेण्यावरही कर लावण्यात आला आहे. टॅक्सच्या रूपात विद्यार्थी व परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या अन्य लोकांना केवळ एक रोपटे लावावे लागणार आहे. या रोपाची देखभालही याच लोकांना करावी लागणार आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना प्रत्येक महिन्याला रोपट्यासोबत सेल्फी घ्यावी लागणार आहे. याच आधारावर विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे अंक देण्यात येतील.

विक्रम विद्यापीठात ऑक्सिजन टॅक्स -

कुलगुरू अखिलेश कुमार यांनी सांगितले, की विक्रम विद्यापीठाच्या 300 एकर कॅम्पसमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यांनी म्हटले की, वृक्षारोपणचे महत्व आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एक मिनिटमध्ये 7 ते 8 लिटर वायू श्वासामार्फत घेतो, त्यामध्ये २० टक्के ऑक्सिजन असतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन 550 लिटर वायू घेतो आणि एक वृक्ष दिवसभरात 750 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करतो. त्याचबरोबर विद्यापीठ परिसरात प्रत्येक दिवशी चार ते पाच हजार लोक सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. या लोकांना टॅक्सच्या रूपात कॅम्पसमध्ये रोप लावावे लागणार आहे.

आता श्वास घ्यायलाही टॅक्स !

विक्रम विद्यापीठाच्या कुलगुरूंचे म्हणणे आहे, की दरदिवशी ४ ते ५ हजार लोक याचप्रकारे ऑक्सिजन कंज्यूम (Consume) करत राहिले तर नॅचरल ऑक्सिजन प्रॉडक्शन इंटरेस्टला प्रोत्साहन कसे मिळणार. याला प्रोत्साहित करण्यासाठीच टॅक्सच्या रुपाच रोपटे लावण्याचा उद्देश्य आहे. रोपटे लावणाऱ्या व्यक्तीचीच त्याच्या देखभालीची जबाबदारी असणार आहे. कुलपतींनी म्हटले की, कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांनी समजले आहे.

विद्यार्थ्यांना झाडांची करावी लागणार देखभाल, त्यानुसारच मिळणार गुण

कुलगुरूंनी सांगितले, की विद्यापीठात अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम बनवण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच रोपट्यांची जबाबदारी देण्यात येईल. आपल्या शिक्षणादरम्यान तीन ते पाच वर्षे तो विद्यार्थी त्या झाडाची काळजी घेईल. विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर पडल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी त्याची जबाबदारी देण्यात येईल. वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टच्या रुपाने गुण देण्यात येतील. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी झाडांसोबत सेल्फी घेऊन त्याची नोंद ठेवावी लागेल.

Last Updated : Aug 4, 2021, 12:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.