ETV Bharat / bharat

Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी - Udhayanidhi Stalin Sanatan Dharma

Udhayanidhi Stalin : सनातम धर्माबाबत केलेल्या वक्तव्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आधी सहकारी पक्ष काँग्रेसनं त्यांच्या या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केलं. आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलानं दिल्ली पोलिसांकडे तक्रार करत स्टॅलिन यांच्यावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

Udhayanidhi Stalin
उदयनिधी स्टॅलिन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 1:32 PM IST

Updated : Sep 3, 2023, 2:17 PM IST

नवी दिल्ली : Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यावरून वाद वाढत आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली. मी संमेलनाला 'सनातन धर्माचा विरोध' म्हणण्याऐवजी 'सनातन धर्माचं उच्चाटन' म्हटल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करतो, असं स्टॅलिन म्हणाले.

  • I never called for the genocide of people who are following Sanatan Dharma. Sanatan Dharma is a principle that divides people in the name of caste and religion. Uprooting Sanatan Dharma is upholding humanity and human equality.

    I stand firmly by every word I have spoken. I spoke… https://t.co/Q31uVNdZVb

    — Udhay (@Udhaystalin) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन : 'काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला संपवल्या पाहिजेत. आपण त्याचा फक्त निषेध करू शकत नाही. डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला त्यांना संपवायचं आहे. सनातन धर्मही असाच आहे. तो मिटवायला हवा. त्यासाठी केवळ निषेध करणं पुरेसं होणार नाही', असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 'हे आपलं पहिले कार्य असावं. कारण सनातन धर्म समता आणि सामाजिक न्याय या दोन्हींना विरोध करतो', असंही ते म्हणाले.

  • Bring it on. I am ready to face any legal challenge. We will not be cowed down by such usual saffron threats. We, the followers of Periyar, Anna, and Kalaignar, would fight forever to uphold social justice and establish an egalitarian society under the able guidance of our… https://t.co/nSkevWgCdW

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाची दिल्ली पोलिसांकडे तक्रार : स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी रविवारी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विनीत जिंदाल यांनी दावा केला आहे की, उदयनिधी स्टॅलिन यांनी भाषणात सनातन धर्माविरोधात प्रक्षोभक, चिथावणीखोर, अपमानास्पद आणि चिथावणीखोर विधान केलं. 'उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपुष्टात आणण्याच्या वक्तव्यामुळे आणि सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरियाशी केल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत', असं जिंदाल म्हणाले.

स्टॅलिन यांच्या बोलण्यातून सनातन धर्माबद्दल द्वेष दिसतो : 'उदयनिधी स्टॅलिन यांच्या बोलण्यातून त्यांचा सनातन धर्माबद्दलचा द्वेष दिसून येतो. ते तामिळनाडू सरकारमधील एक आमदार आणि मंत्री आहेत. त्यांनी आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार काम करण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. परंतु त्यांनी सनातन धर्मावर जाणीवपूर्वक प्रक्षोभक आणि अपमानास्पद विधानं केली. याचा उद्देश समाजात धर्माच्या आधारे संघर्ष निर्माण करणे आहे', असं ते म्हणाले.

स्टॅलिन यांच्यावर एफआयआर दाखल करा : 'उदयनिधी स्टॅलिन यांनी असं विधान करून भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा केला आहे. हे दखलपात्र गुन्हे असून ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे स्टॅलिन यांच्याविरुद्ध वरील कलमांअतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा', असं वकील विनीत जिंदाल म्हणाले.

हेही वाचा :

  1. One Nation One Election : एक राष्ट्र-एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  2. Murder in Union Ministers House : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात एकाची हत्या, मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

Last Updated : Sep 3, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.