चेन्नई Udhayanidhi Stalin on Sanatana Controversy : तामिळनाडूचे सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. सनातन धर्माबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरातील भाजपाच्या नेत्यांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली होती. कथित वादग्रस्त विधानाबाबत उदयनिधी म्हणाले, की भाजप नेत्यांनी माझ्या भाषणाला 'नरसंहाराला चिथावणी देणारे' म्हटले आहे. प्रत्यक्षात आम्ही कोणत्याही धर्माचे शत्रू नाही, हे सर्वांना माहीत आहे.
कथित सनातन धर्मविरोधी वक्तव्यावरून भाजप आणि द्रमुक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. डीएमके नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरुवारी भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपानं त्यांच्या विधानाचा विपर्यास केलाय. यासंदर्भातील सर्व खटल्यांना व कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची त्यांनी तयारी आहे. मणिपूर हिंसाचारावरील प्रश्नांना सामोरे जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीती वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मीदेखील धार्मिक व्यक्ती आहे. मात्र, अस्पृश्यता, गुलामगिरी शिकविणाऱ्या धर्माला विरोध करणारा मी पहिला व्यक्ती असणार आहे. मणिपूरमधील दंगलीत 250 हून अधिक लोकांची हत्या आणि 7.5 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
कोणत्याही धर्माला शत्रू मानत नाही- उदयनिधी- उदयनिधी म्हणाले की, भाजपानं गेली 9 वर्षे पोकळ आश्वासन दिली आहेत. जनतेच्या कल्याणासाठी नेमकं काय केलं, हा प्रश्न संपूर्ण देश विचारतोय . फॅसिस्ट भाजप सरकारच्या विरोधात एकजूट दाखविली जातेय. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री 'फेक न्यूज'च्या कारवाई करण्याची मागणी करत आहेत. हे आश्चर्यकारक आहे. त्यांना जगण्याचा दुसरा मार्ग माहित नाही, हे मला माहित आहे. त्यामुळेच मी त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठ द्रविडीयन नेते दिवंगत सीएन अण्णादुराई यांच्या राजकीय वारसांपैकी आम्ही एक आहेत. आम्ही कोणत्याही धर्माला शत्रू मानत नाही.
आक्षेपार्ह वक्तव्याचे देशभरात उमटले पडसाद- तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतेच सनातन धर्म संपविण्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिल्लीत त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलीय. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सनातन धर्माबाबत टीका करणाऱ्यांना योग्य प्रकारे उत्तर द्या, अशा सूचना भाजपाच्या नेत्यांना केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा-
- Kalicharan Maharaj On Udayanidhi Stalin: उदयनिधी स्टॅलिनवर भडकले कालीचरण महाराज, असभ्य शब्दात केली टीका
- Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : सनातन धर्म संपुष्टात आणलाच पाहिजे, मी माझ्या विधानावर ठाम - उदयनिधी स्टॅलिन
- Sanatana Dharma Remark Row: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर...स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला