ETV Bharat / bharat

Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : सनातन धर्म संपुष्टात आणलाच पाहिजे, मी माझ्या विधानावर ठाम - उदयनिधी स्टॅलिन - Sanatan Dharma

Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : 'सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे', असं विधान करणारे एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. 'आपण नरसंहाराबद्दल बोललोच नाही', असं ते म्हणाले. वाचा पूर्ण बातमी..

Udhayanidhi Stalin
उदयनिधी स्टॅलिन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 1:36 PM IST

Updated : Sep 4, 2023, 2:26 PM IST

चेन्नई : Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दोन दिवसांपूर्वी सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपानं यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, दिल्लीत त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलीय.

मी नरसंहाराचं आवाहन केलं नाही : उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी याला उत्तर दिलं. 'आपण आपल्या विधानावर ठाम असून, मी नरसंहाराचं आवाहन केलं नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे, असं मी म्हणत राहीन, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 'सनातन धर्म हा कायमस्वरूपी आहे. तो बदलू शकत नाही. तर द्रविड विचारधारा परिवर्तनाचा संदेश देते. द्रविड संकल्पनेत सर्व समान आहेत, कोणताही भेदभाव नाही. सनातन धर्मानं लोकांना जातींमध्ये विभागलं आहे, जे मानवतेच्या हिताचे नाही. मात्र, काही लोक माझ्या शब्दांना बालिशपणानं फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत की मी सनातन धर्माला मानणाऱ्या लोकांचा नरसंहार करण्याचं आवाहन केलंय', असं स्टॅलिन म्हणाले.

  • I never called for the genocide of people who are following Sanatan Dharma. Sanatan Dharma is a principle that divides people in the name of caste and religion. Uprooting Sanatan Dharma is upholding humanity and human equality.

    I stand firmly by every word I have spoken. I spoke… https://t.co/Q31uVNdZVb

    — Udhay (@Udhaystalin) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी

भाजपा वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहे : काही लोक 'द्रविडम' ला संपवा असं म्हणत होते. याचा अर्थ द्रमुक कार्यकर्त्यांना मारणे आहे का? असा सवाल त्यांनी केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे 'काँग्रेसमुक्त भारत'ची हाक देतात. पण याचा अर्थ सर्व काँग्रेस नेत्यांना मारलं पाहिजे असा होत नाही. भाजपा वस्तुस्थितीचा विपर्यास करत खोटं पसरवत आहे. ही त्यांची नित्याची सवय आहे', असा आरोप स्टॅलिन यांनी यावेळी केला.

मी धमक्यांना घाबरत नाही : 'भाजपा इंडिया युतीला घाबरली आहे. ते जनतेला खऱ्या मुद्द्यांपासून भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत', असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 'मात्र भाजपाच्या कोणत्याही आरोपांना सामोरे जाण्यास आपण तयार असून, मी धमक्यांना घाबरून जात नाही', असा दम त्यांनी दिला.

हेही वाचा : Sanatana Dharma Remark Row: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर...स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Sep 4, 2023, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.