चंदीगड (हरियाणा ) : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन तरुणांनी शिवलिंगावर बिअरचा अभिषेक केला आहे. व्हायरल होत असलेल्या या तरुणांच्या व्हिडिओमध्ये एक तरुण शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करत असून दुसरा तरुण व्हिडिओ बनवत आहे. दोन्ही तरुण नशेच्या अवस्थेत असून, यातूनच त्यांनी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. ( Chandigarh youth Shivling beer viral video )
या व्हिडिओमध्ये भोले बाबाचे पार्श्वसंगीत जोडले गेले आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण हिंदू समाजाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागाने कारवाई सुरू केली असून, त्याचवेळी सर्वसामान्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू समाजाने न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंदू संस्कृतीच्या भावनांशी छेडछाड करून पवित्र शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करून एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडणारे लोक विकास नगर, चंदिगड येथील रहिवासी आहेत. या घटनेबाबत हिंदू समाजात संतापाचे वातावरण असून या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलीस खात्याकडे देण्यात आली असून, लवकरच याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.