हरिद्वार (उत्तराखंड) - पौरी बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हरिद्वारच्या चंडी घाटावर दाखल झाले होते. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीचे दृष्य अंधकारमय असले तरी आज स्मशानभूमीचे दृश्य अतिशय हृदय पिळवटून टाकणारे आहे. 17 जणांच्या मृतदेहांचे एकत्रित अंत्यसंस्कार पाहून सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. हरिद्वार जिल्हा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
4 ऑक्टोबरच्या संध्याकाळी उशिरा लालधंग ते बिरखलच्या कांडा तल्ला गावाकडे जाणारी मिरवणुकांनी भरलेली बस सिमडीजवळ खड्ड्यात पडली होती. या भीषण अपघातात आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात अतिशय भीषण होता. जिथे लोक आनंदाने लग्न समारंभाला हजेरी लावणार होते तिकडे मात्र, वधूच्या गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आनंदाचे रूपांतर क्षणात शोकात झाले.
बस अपघातातील मृतांचे मृतदेह हरिद्वारच्या चंडी घाटावर नेण्यात आले. इथे अखंड दु:खात बुडालेले वातावरण आहे. येथे एका कुटुंबात कुणीही राहिले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या कुटुंबातील पोटापाण्यासाठी कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाला नोकरी आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांची सरकारकडे आहे.