ETV Bharat / bharat

Girl Dies in Dog Attack: सुरतमध्ये भटक्या कुत्र्याने चावल्याने दोन वर्षीय मुलीचा मृत्यू, ३० ठिकाणी झाल्या होत्या जखमा - दोन वर्षीय मुलीचा झाला मृत्यू

देशभरात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता हल्ल्याचे नवे प्रकरण हे गुजरातच्या सुरत शहरातील आहे. येथे एका कुत्र्याने दोन वर्षीय मुलीचा चावा घेतला होता. आता तीन दिवसानंतर उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Two year old girl dies of dog bite in Surat during treatment
सुरतमध्ये भटक्या कुत्र्याने चावल्याने दोन वर्षीय मुलीचा मृत्यू, ३० ठिकाणी झाल्या होत्या जखमा
author img

By

Published : Feb 23, 2023, 7:28 PM IST

सुरत (गुजरात): सुरतमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने दोन वर्षांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुत्रा चावल्यामुळे मुलीच्या अंगावर ३० हून अधिक जखमेच्या खुणा आढळल्या होत्या. सध्या मुलीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. शहरातील खजोद भागात कुत्रा चावल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर आज एका मुलीचा मृत्यू झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीला नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्यावेळी मुलीच्या अंगावर 30 हून अधिक कुत्र्यांच्या चाव्याच्या जखमा आढळून आल्या. याशिवाय मुलीच्या डोक्यावर, छातीवर व इतर ठिकाणी गंभीर जखमा असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तीन दिवसांच्या उपचारानंतर रात्री उशिरा मुलीचा मृत्यू झाला.

दोन ते तीन तास केली शस्त्रक्रिया: याबाबत मयत मुलीचे वडील रवीभाई यांनी सांगितले की, १९ तारखेला रात्री नऊच्या सुमारास माझ्या पत्नीचा फोन आला. आमच्या मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याचे तिने सांगितले. यानंतर मुलीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या डोक्याला आणि पोटावर जखमा होत्या. मुलगी दोन वर्षांची होती. याबाबत नवीन सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉ.केतन नायक यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलीवर तीन कुत्र्यांनी हल्ला केला होता. या मुलीच्या शरीरावर कुत्र्यांच्या चाव्याच्या ३० हून अधिक जखमा आढळून आल्या आहेत. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्यावर हिमोग्लोबिनसह सर्व प्रगत उपचार करण्यात आले. याशिवाय शस्त्रक्रिया विभागात मुलीवर दोन ते तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले निष्फळ: डॉ केतन नायक पुढे म्हणाले की, ऑपरेशननंतर मुलीला जशी वागणूक द्यायची होती तशीच वागणूक देण्यात आली. मुलीला वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात होते. मात्र दुर्दैवाने उपचारानंतर मुलीचा पहाटे दीड वाजता मृत्यू झाला. मुलीचा मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, रूग्णालयात दररोज 40 ते 50 कुत्र्यांच्या चाव्याच्या केसेस येतात.

हैदराबादमध्येही झाला असाच प्रकार: नुकतेच तेलंगणातील हैदराबाद शहरातही अशाच प्रकारे कुत्र्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या लहान मुलांना चावा घेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकारानंतर देशातही अनेक ठिकाणी असेच प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. या भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: EPS as Interim GS: एआयएडीएमकेमध्ये पुन्हा एकदा 'एकल नेतृत्त्व'.. सर्वोच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब, पलानीस्वामीच सरचिटणीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.