जम्मू काश्मीर - जम्मूमध्ये टीआरएफ(द रेजिस्टेंस फ्रंट) संघटनेशी संबंधित असलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रेही हस्तगत कऱण्यात आली आहेत. जम्मू पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.
रईस अहमद दार, (काझीगुंड) आणि सब्जार अहमद शेख उर्फ अश्मुजी(कुलगाम)अशी या दोन दोघा दहशतवाद्यांची नावे आहेत. ते कारने श्रीनगरकडे जात होते. त्यावेळी नारवल येथील बाह्यमार्गाजवळ पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने त्यांना अटक केली. शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चेकपोस्ट चूकवण्याच्या होते तयारीत-
पोलिसांना या दोन दहशवाद्यांसदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी श्रीनगर रोडवर नाकाबंदी केली. मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी श्रीनगर मार्गावरील वाहनांची तपासणी सुरू केली. काही कालावधीतच पोलिसांना हवे असलेल्या संशयितांची अल्टो कार तपासणी नाक्यावर आली. मात्र, नाका चूकवून फरार होण्याची तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
शस्त्रास्त्रे हस्तगत-
दोघांकडे असलेल्या एका बँगमध्ये एके रायफल दोन मॅगेझिन, ६० राऊंड आणि पिस्तुल आणि दोन मॅगझिन सह १५ गोळ्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करत दोघांनाही अटककेली आहे. बहू फोर्ट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामधील दार हा दहशतवादी कारवायामध्ये सक्रीय आहे. त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. तो टीआरएफसाठी काम करतो.