ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : पुंछ जिल्ह्यात दोन सैनिक हुतात्मा - पुंछ जिल्ह्यात दोन सैनिक हुतात्मा

दहशतवादविरोधी कारवाईत गुरुवारी एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक सैनिक शहीद झाले आहेत. पुंछ जिल्ह्यात दहशतादविरोधात लढा देताना गेल्या पाच दिवसांत सात जवान हुतात्मा झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भींबर गली ते सुरणकोटे दरम्यान महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर :  पुंछ जिल्ह्यात दोन सैनिक हुतात्मा
JCO, soldier killed in action in J&K's Poonch
author img

By

Published : Oct 15, 2021, 10:38 AM IST

जम्मू-काश्मीर - पुंछ जिल्ह्यातील दहशतवादविरोधी कारवाईत गुरुवारी एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एक सैनिक शहीद झाले आहेत. ही माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली. पुंछ जिल्ह्यात दहशतादविरोधात लढा देताना गेल्या पाच दिवसांत सात जवान हुतात्मा झाले आहेत.

जम्मू -काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपसह (एसओजी) भारतीय लष्कराच्या जवानांनी घनदाट जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भींबर गली ते सुरणकोटे दरम्यान महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहिम सुरू केली आहे. तर दहशतवाद्यांकडून सामान्यांना लक्ष केले जात आहे. काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्द नष्ट करण्यासाठी सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडित, हिंदू आणि शीख समुदायाच्या नागिरकांना लक्ष्य केले होते.

दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत -

दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गृह मंत्रालय मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने प्रदेश नेतृत्वाशी चर्चा केली आहे. काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची यादी गुप्तचर संघटना आणि सुरक्षा संस्थाकडून यादी मागितली आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मोदी सरकार इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क भक्कम करत आहे. केवळ दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत ठेवणाऱ्या 'टीएमएस आणि एनएमबी' नेटवर्कचा देशभरात आणखी 451 ठिकाणी विस्तार केला जाणार आहे. गेल्या वर्षी सुरू केलेली ही मोहिम चालू वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार आहे.

हेही वाचा - देशातील युवकांमध्ये व्यसनाधीनधा वाढली - सरसंघचालक मोहन भागवत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.