मुजफ्फरनगर - उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर येथील खाजगी शाळेच्या दोन व्यवस्थापकांवर 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न ( School Managers Assaulted 17 Girls ) केला असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे तर दुसरा हा अद्याप फरार आहे. पुरकाजी आणि भोपा पोलीस ठाणे परिसरातील खाजगी शाळेच्या दोन व्यवस्थापकांवर लैंगिक अत्याचार, अमली पदार्थ खाऊ घालणे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ खाऊ घालून बलात्कार करण्याचा प्रयत्न -
ही घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दुसऱ्या ठिकाणी मुलींना नेण्यात आले होते. त्यांना रात्रभर त्याठिकाणी थांबावे लागले. यावेळी 17 मुलींना दोन व्यवस्थापंकानी अमली पदार्थ खाऊ घालून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
कठोर शिक्षा करण्याची मागणी -
या घटनेनंतर उत्तरप्रदेश हादरले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. मुलींच्या पालकांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
मुलींची छेडछाडकरून नापास करण्याची दिली धमकी -
एका मुलीच्या पालकांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, आरोपी व्यवस्थापक हे प्रात्यक्षिक परीक्षेच्या घेण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते. रात्री उशिर झाल्याचे सांगून त्यांना रात्री शाळेत थांबायचे सांगितले. दूर-दूर वरून आलेल्या मुलींच्या खिचडीत अमली पदार्थांचे मिश्रण करून त्यांना खाऊ घातले. त्यांना प्रकृती खराब होताच त्यांच्यासोबत छेडछाड करण्यास सुरूवात केली. आणि त्यांना परीक्षात नापास करण्याची धमकी देखील दिली. या भीतीने मुलींनी शाळेत जायचे बंद केले. सोमवारी भाजपा आमदार प्रमोद ऊंटवाल यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस या प्रकरणात सक्रिय झाले. पोलिसांनी याप्रकरणात पाच टिम बनवून तपास सुरू केला आहे.