दिल्ली- इंदिरा गांधी अंतराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेल वर्ल्ड मार्कमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील दोन जणांना अटक केली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विमानतळ पोलिसांकडून कारवाई
विमानतळावरील पोलीस निरिक्षक राजीव रंजन यांनी मारामारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. तरनजीत और नवीन कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तरनजीत कार विकण्याचे काम करतो तर नवीन मालमत्ता संबंधित व्यवसाय करतो. या प्रकरणी आणखी लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती रंजन यांनी दिली आहे.
हेही वाचा.. 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका