ETV Bharat / bharat

व्हिसा संपल्यानंतरही पाकिस्तानी नागरिक भारतात फिरत होता, पोलिसांना कळालं आणि.... - सीमा ओलांडून भारतात प्रवेश

पाकिस्तानच्या दोन नागरिकांना भारताने सुखरुप पाकिस्तानच्या जवानांच्या ताब्यात दिलं. यातील एक जण चुकून सीमा पार करून भारतात आला होता. तर दुसरी व्यक्ती व्हिसा संपल्यानंतरही भारतात फिरत होती.

Two Pakistan nationals sent back via Attari border
भारतीय सैन्याने 'त्या' पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी सोपवलं
author img

By

Published : Aug 29, 2021, 10:15 AM IST

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा भागात होणारी एखादी चकमक ही काही नवी बाब नाही. पण, सध्या भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. पाकिस्तानच्या दोन नागरिकांना भारताने सुखरुप पाकिस्तानच्या जवानांच्या ताब्यात दिलं. यातील एक जण चुकून सीमा पार करून भारतात आला होता. तर दुसरी व्यक्ती व्हिसा संपल्यानंतरही भारतात फिरत होती.

भारतीय तुरुंगात असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना शनिवारी अटारी सीमेद्वारे पाकिस्तानला सोपवण्यात आले. दोघांपैकी एक अल्पवयीन आहे. अब्बास अली खान (42) आणि भाग चंद (17) अशी त्या दोघांची नावे आहेत. ही माहिती अटारी बॉर्डरचे प्रोटोकॉल अधिकारी अरुणपाल सिंह यांनी दिली.

अब्बास अली खान हा पाकिस्तानातील रहीम यार खान येथील रहिवासी आहे. 2005 मध्ये तो एका महिन्याच्या व्हिसावर समझौता एक्सप्रेसद्वारे दिल्लीत आला होता. नंतर, तो ग्वाल्हेरला गेला. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो भारतात फिरत होता. अखेर ग्वाल्हेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि शिक्षा ठोठावली. अखेर 16 वर्षानंतर ग्वाल्हेर मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे. तर भाग चंदने राजस्थानमध्ये अनवधानाने सीमा ओलांडली आणि भारतात आला. यावर त्यालाही दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली. अखेर दोघांनाही अटारी सीमेवर पाकिस्तानला सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा - भारत-पाक सीमेवरून सहा पाकिस्तानी तरुणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.