श्रीनगर (जम्मू ) - अनंतनाग चकमकीत दोन दहशतवादी ठार ( Two militants killed in Encounter ) झाले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला ( gunfight in the Bijbehera area ) आहे.
सुरक्षा दलाने कारवाईत काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन ( search operation by security forces ) सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ( Kashmir Zone Police ) दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलीस, लष्कराच्या 3 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील शट्टीपोरा गावात शोध मोहीम सुरू केली. आयजीपी काश्मीरच्या म्हणण्यानुसार, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यामुळे चकमक घडून आली.
गावात आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिस आणि सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणावर तैनातीनंतर काही मिनिटांत ही चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांना सुरक्षा दलांसोबत जास्त वेळ चकमकीसाठी वेळ मिळाला नाही. त्यांना तत्काळ गोळ्या लागल्याचे साक्षीदारांनी सांगितले. इशाक अहमद गनई आणि यावर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही शेजारच्या डोगरीपोरा गावातील रहिवासी होते.
हेही वाचा-PM Modi Gujarat Visit : बापूंच्या स्वप्नांचा भारत घडवित आहोत - नरेंद्र मोदी