ETV Bharat / bharat

राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान हुतात्मा - JK Encounter

Rajouri Encounter : सुरक्षा दलांना राजौरी जिल्ह्यात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसराला वेढा घातला. या दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले आहेत.

Rajouri Encounter
Rajouri Encounter
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 7:38 PM IST

Updated : Nov 22, 2023, 8:47 PM IST

राजौरी Rajouri Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बुधवारी (२२ नोव्हेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले. ही चकमक स्थानिक धर्मसालच्या बाजीमल भागात झाली. या भागात दहशतवाद्यांच्या एका गटाच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर विशेष दलांसह सैन्य तैनात करण्यात आलं होतं.

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती : राजौरी जिल्ह्यातील धरमसालच्या बाजीमल भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला. या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह (कॅप्टन) चार जवान हुतात्मा झाले आहेत.

अनेक जवान जखमी : राजौरीतील बाजी माल जंगलात झालेल्या चकमकीत सुरुवातीच्या गोळीबारात सैन्याच्या एका कॅप्टनचा मृत्यू झाला. तर इतर तीन पॅरा कमांडो गंभीर जखमी झालेत. त्यानंतर दोन सैनिकांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्य जखमी सैनिकाची प्रकृती स्थिर आहे. या परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबारात अनेक जवान जखमीही झाले आहेत.

शुक्रवारच्या चकमकीत एक दहशतवाद ठार : या आधी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. भारतीय सैन्य, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या संयुक्त पथकानं बुधल तहसीलच्या गुलेर-बेहरोटे भागात घेराबंदी आणि शोध मोहीम (CASO) केली होती. दरम्यान ही चकमक झाली.

पाच दहशतवाद्यांचा खात्मा : गेल्या शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रात्रभर झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुलगामच्या नेहामा गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितलं की, आधी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी दहशतवादी उपस्थित असलेल्या परिसराला कडेकोट बंदोबस्त घातला होता.

हेही वाचा :

  1. Kulgam Encounter Update: सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच दहशतवादी ठार, सलग दुसऱ्या दिवशी सुरू होती चकमक

Last Updated : Nov 22, 2023, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.