ETV Bharat / bharat

सुरक्षा दलाला यश; पुलवामातील चकमकीत हिजबुलचे दोन दहशतवादी ठार

दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ख्रुव पाम्पोरी येथील मुसाईब अहमद भट आणि छकुरा पुलवामा येथील मुझमिल अहमद राथर अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलिसांकडील रेकॉर्डनुसार भटवर दहशतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत

militants killed in encounter
militants killed in encounter
author img

By

Published : Aug 20, 2021, 8:07 PM IST

श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने पुलवामा येथे ठार केले आहे. या दहशतवाद्यांनी विविध हल्ल्यांमध्ये नागरिकांनाही ठार केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुलवामा जिल्ह्यातील ख्रीव आणि पाम्पोरी भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम सुरू केली. दहशतवादी लपून बसल्याची खात्री पटताच सुरक्षा दलाने त्यांना शरण येण्याचे आव्हान केले. मात्र, त्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार केला. त्याची परिणीती सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत झाली. या चकमकीदरम्यान हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा-ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची काढली पोस्ट, नियमभंग केल्याचे दिले कारण

दहशतवाद्याचा नागरिकांवरील हल्ल्यात सहभाग

दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ख्रुव पाम्पोरी येथील मुसाईब अहमद भट आणि छकुरा पुलवामा येथील मुझमिल अहमद राथर अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलिसांकडील रेकॉर्डनुसार भटवर दहशतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नागरिकांवर दहशतवादी हल्ले करण्याकरिता नियोजन आणि हल्ले घडविण्याच्या जबाबदारीत भट सहभागी होता. लुरग्राममधील जावीद अहमद मलिक या नागरिकाला ठार करण्याच्या घटनेतही भट सहभागी होता. या हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याने दक्षिण काश्मीरमधील नागरिकांना ठार केले होते, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. राथर हा नुकतेच दहशतवादी गटात सहभागी झाला होता.

हेही वाचा-2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे- सोनिया गांधी

घटनास्थळावरून शस्त्र, स्फोटकांसह एके-रायफल आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून पुढील तपास केला जाणार असल्याचो पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा-नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ITBP चे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह 2 जवान हुतात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.