हाथरस (उत्तर प्रदेश) - यमुना एक्सप्रेस वे वर जिल्ह्यातील मिढावली गावाजवळ धुक्यामुळे विविध वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ वाहनांची एकमेकांसोबत धडक झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल
याप्रकरणी थाना सादाबाद येथील पोलीस अधीक्षक विनीत जायस्वाल यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, सकाळी सात वाजताच्या सुमारास धुक्यामुळे काही वाहनांचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या घटनेतील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मध्य प्रदेशमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू , 5 जण जखमी
हेही वाचा - सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ९ जखमी