अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील श्री गफवारा भागात लष्कराच्या दोन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात लष्कराचे सात जवान जखमी झाले आहेत. (Two army vehicles accident in Anantnag).
जखमींची प्रकृती स्थिर : शनिवारी दुपारी अनंतनागच्या श्री गफवारा भागात लष्कराची दोन वाहने रस्त्याच्या मधोमध उलटून हा अपघात झाला. या गाडीत लष्कराचे अनेक जवान होते, त्यापैकी सात जवान जखमी झाले. जखमी सैनिकांना तातडीने अनंतनागच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.