ETV Bharat / bharat

Twitter CEO Elon Musk Favor : ट्विटरचे सीईओ ॲलोन मस्कचे ट्विट चर्चेत, भारतीयांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव - ट्विटरचे सीईओ ॲलोन मस्कचे ट्विट चर्चेत

ट्विटरचे सीईओ ॲलॉन मस्क अमेरिकेत येणाऱ्या मेहनती लोकांच्या बाजूने आहेत. आशियाई लोकांसाठी, विशेषतः भारतातील कर्मचाऱ्यांसाठी अमेरिका हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, 2010 ते 2021 दरम्यान यूएसमध्ये भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत 52.17 टक्कयाने ने वाढ झाली आहे.

Twitter CEO Elon Musk Favor
ट्विटरचे सीईओ एलोन मस्कचे ट्विट चर्चेत
author img

By

Published : Feb 14, 2023, 8:45 PM IST

नवी दिल्ली: ट्विटरचे सीईओ ॲलोन मस्क यांनी मंगळवारी सांगितले की, चीन आणि इतर आशियाई देशांतील स्थलांतरितांनी (जसे की भारत) अमेरिकेत अविश्वसनीय योगदान दिले आहे. मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी अमेरिकेत येणाऱ्या कष्टकरी लोकांच्या बाजूने आहे'. परंतु, आमच्याकडे स्क्रीनिंगशिवाय खरोखर खुली सीमा असू शकत नाही. आमची कायदेशीर इमिग्रेशन प्रणाली खूप मंद आहे आणि नेव्हिगेट करणे खूप कठीण आहे.'

अमेरिकेत स्थालांतर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : एका फॉलोअर्सने उत्तर दिले, 'हे दुर्दैवी आहे की काही देशांसाठी ग्रीन कार्ड देण्याची प्रक्रिया फार लांबवली आहेत. काँग्रेसने हे दुरुस्त करणे आवश्यक आहे.' आशियाई लोकांसाठी, विशेषतः भारतातील नोकऱ्यांसाठी अमेरिका हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. यूएस सेन्सस ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2010 ते 2021 दरम्यान यूएसमध्ये भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत 52.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2010 मध्ये भारतातून अमेरिकेत 17.80 लाख स्थलांतरित होते, जे 2021 मध्ये 27.09 लाखांवर पोहोचले.

काय सांगते आकडेवारी : सीमाशुल्क सीमा संरक्षणाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील परदेशी वंशाच्या लोकसंख्येपैकी सध्या भारतीय वंशाचे लोक 6 टक्के आहेत. दरम्यान, यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने 2022 च्या शेवटच्या तिमाहीत यूएस-मेक्सिको सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 1,862 चिनी नागरिकांना रोखले. फेडरल डेटानुसार, फेब्रुवारी 2021 पासून CBP द्वारे आलेल्या अवैध चिनी स्थलांतरितांची संख्या दर महिन्याला सातत्याने वाढत आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, जानेवारी २०२१ मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पदभार स्वीकारल्यापासून विक्रमी संख्येने बेकायदेशीर स्थलांतरितांनी अमेरिकेत प्रवेश केला आहे.

इलॉन मस्कचे धोरण : तर दुसरीकडे, ॲलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर या सोशल मीडिया कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून रोज नवनवीन निर्णयांच्या बातम्या येत आहेत. ट्विटरचे मालक ॲलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. या निर्णयामुळे ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे कर्मचारी जवळजवळ निम्म्याने कमी होतील.

नोटिस दिलेल्या कामगारांना 60 दिवसांचा पगार दिला जाऊ शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मस्क ट्विटरचे धोरण संपविण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना 'कायमचे' घरून काम करण्याची परवानगी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटर विकत घेण्याच्या करारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मस्कने अयशस्वी झाल्यानंतरच त्याने मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीच्या धोरणाचा विचार करण्यास सुरुवात केली, असे बोलल्या जात आहे.

हेही वाचा : Layoff News : 12 दिवसांमध्ये कंपन्यांनी 17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.