पाटणा : जमीनीच्या वादातून भावकीतीलच तीन जणाचा चाकुने भोसकून माथेफिरू बापलेकाने खून केल्याने खळबळ उडाली. स्वामीनाथ महातो, राजेश्वर महातो आणि दिनेश महतो असे चाकूने खून करण्यात आलेल्या मृतकांची नावे आहेत. ही घटना एकमा परिसरातील गंगवा गावात शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना छपरा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लालू महतो आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.
"हे जमिनीच्या वादाचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. चाकूने भोसकल्याने या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत - चौकीदार, एकमा पोलीस ठाणे
जमिनीच्या वादातून चाकुने भोसकले : एकमा परिसरातील गंगवा गावात जमिनीवरून लालू महातो याचा स्वामीनाथ महातो, राजेश्वर महतो आणि दिनेश महातो यांच्याशी वाद सुरू होता. हे सर्व आपसात भाऊ असून भावकीतील जमीनीचा वाद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी रात्री राजेश्वर यांचा मुलगा पाणी काढण्यासाठी चपाकल येथे गेला असता लालूच्या मुलाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी राजेश्वरने विरोध केल्याने त्याच्यावर लालूच्या मुलाने चाकूने हल्ला केला. त्यामुळे राजेश्वरने बचावासाठी घराकडे धाव घेतली. मात्र लालूच्या मुलाने भांडण सोडवण्यास आलेल्या सगळ्यांवर चाकुने वार केले.
प्रथम दोन मुलांमध्ये वाद झाला, नंतर त्यांनी चाकूने आमच्यावर हल्ला केला. त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. तीन जणांचा मृत्यू झाला आहे - कुटुंब
आधी झाडल्या गोळ्या मग केला चाकूहल्ला : ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. लालूंच्या मुलाने चपाकल येथे पाणी भरत असताना गोळ्या झाडल्या. विरोध केल्यावर त्याने चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जखमी मुलगा घरी पळत आला, त्याचे वडीलही त्याच्यासोबत तेथे आले आणि त्याच्यावर हल्ला केला. दोघा बापलेकांनी चाकूने वार केले. रामेश्वर त्याला वाचवायला गेला असता त्याच्यावरही चाकूने वार केले. दिनेश लाल यालाही चाकूने वार करत ठार केले. तिन्ही जणांवर अनेक वेळा वार करण्यात आल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
चाकूने भोसकून तिघांचा खून : लालू महतो आणि त्याच्या मुलाने चाकुने तिन जणांना ठार केले. यात स्वामीनाथ महातो, राजेश्वर महातो आणि दिनेश महतो चाकूने जबर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर भांडण सोडवण्यास आलेल्या इतर अनेक जणांना लालू आणि त्याच्या मुलाने चाकूने वार करुन जखमी केले. घटनेची माहिती मिळताच एकमा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व जखमींना उपचारासाठी छपरा सदर रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लालू आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.