ETV Bharat / bharat

गोव्यात तृणमूलकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू, प्रादेशिक नेते ममता बॅनर्जींच्या भेटीला - eat bharat

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन करायच्या तयारीला लागले आहेत.

, प्रादेशिक नेते ममता बॅनर्जींच्या भेटीला

author img

By

Published : Oct 30, 2021, 3:23 PM IST

Updated : Nov 1, 2021, 5:30 PM IST

पणजी- गोव्यात राजकारणाची समीकरणे बदलत आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोव्यात विरोधी पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी सुरू केली आहे.

गोव्यात तृणमूलकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू,

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी स्थापन करायच्या तयारीला लागले आहेत.

हेही वाचा-गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, प्रादेशिक पक्षांची तृणमुलशी युती

काँग्रेसकडून युतीला नकार

सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्या बरोबरीने राज्यातील प्रादेशिक पक्ष विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही भूमिका निभावत आहेत. गोव्यात महाराष्ट्र गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचे सत्ता बनविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, या पक्षांना दुय्यम न राहता महत्त्वाचा राजकीय घटक होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डने काँग्रेसशी युतीचा हात मागितला होता. मात्र, काँग्रेसने त्याला केराची टोपली दाखविली. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रादेशिक पक्ष एकत्र येवून तृणमूल काँग्रेससोबत जाऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत.

हेही वाचा-ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर, अज्ञातांनी उखडले बॅनर, फासले काळे

गोवा फॉरवर्डचा युतीचा प्रस्ताव
काँग्रेसने युतीचा हात मागे घेतल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन तृणमूल काँग्रेसला साथ देण्याची गरज असल्याचे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदार व कार्याध्यक्ष किरण कांडोलकर यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांची शनिवारीभेट घेतली.

हेही वाचा- गोव्यात ममता बॅनर्जींचे आगमन; हिंदू संघटनांनी दाखवले काळे झेंडे

मगोचे नेते सुधीन ढवळीकरही ममतांच्या भेटीला
महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांनीही ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. मात्र बॅनर्जी यांनी त्यांना आपला पक्ष तृणमूल मध्ये विलीन करून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला. मात्र आपले प्रादेशिक हित जपण्यासाठी आपण कोणताही निर्णय घेतला नसल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. तृणमूल राज्यात 40 विधानसभा जागांवर निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेतेही ममतांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव बाणावली व तर कन्या वालांका आलेमाव न्हवेली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आलेमाव यांना २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतून पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सोपा झाला होता. मात्र, यंदा अद्याप युती निश्चित नसल्यामुळे आलेमाव यांनी तृणमूल सोबत जाणे पसंत केले. त्यातच त्यांना 2017 ला पाठींबा देणारे लुझिनो फलेरो यांच्या खांद्यावर तृणमूलने निवडणुकीची जबाबदारी दिल्याने त्यांना ही निवडणूक अधिकच सोपी जाणार आहे.

अपक्षही भेटीला
गोवा राज्यात रोहन खवटे आणि प्रसाद गावकर हे दोन अपक्ष आमदार 2017 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यातील प्रसाद गावकर यांनी आधीच हातात तृणमूलचा झेंडा हाती घेतला आहे. अपक्षात राहिलेले एकमेव आमदार रोहन खवटे यांनीही शुक्रवारी ममतांची भेट घेतली. त्यामुळे या सर्व राजकीय भेटीने राज्यात भाजप, काँग्रेस यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेस तिसरी आघाडी उभारणार हे निश्चित झाले आहे.

ममतांनी काँग्रेसवर बोलणे टाळले
केंद्रात काँग्रेसचा हात धरणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी राज्यातील काँग्रेस युतीबाबत बोलणे टाळले. आधीच त्यांनी लुझिनो फलेरोसह अनेक नेत्याना आपल्या पक्षात घेऊन काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे.

Last Updated : Nov 1, 2021, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.