किन्नौर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात ट्रेकिंगसाठी गेलेले 8 पर्यटकांसह 11 जण बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांची मदत मागितली आहे. किन्नौरचे उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांमध्ये पर्यटकांसह ट्रॅकर, कुक आणि गाईड यांचा समावेश आहे.
बेपत्ता झालेले 8 पर्यटक दिल्ली आणि कोलकाताचे रहिवासी आहेत. हे सर्व 11 ऑक्टोबर रोजी हर्सीलहून चितकुलकडे रवाना झाले होते. तर 19 ऑक्टोंबरला ते निश्चित स्थळी पोहचणार होते. मात्र, मंगळवारी जेव्हा ते तेथे पोहोचले नाहीत. तेव्हा ट्रेकिंग आयोजकांनी उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला याबाबत माहिती दिली. लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे. संघात 8 सदस्य, 1 स्वयंपाकी आणि दोन मार्गदर्शक सामील आहेत.
टीममधील सदस्य...
टीमच्या सदस्यांची ओळख दिल्लीची अनिता रावत (38), पश्चिम बंगालचे मिथुन दारी (31), तन्मय तिवारी (30), विकास मकाल (33) सौरभ घोष (34), सवियन दास (28), रिचर्ड मंडल ( 30), सुकन मांझी. (43) अशी आहे. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख देवेंद्र (37), ज्ञानचंद्र (33) आणि उपेंद्र (32) अशी आहे. हे सर्वजण उत्तरकाशीतील पुरोलाचे रहिवासी आहेत.
हेही वाचा - 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; मात्र दुसऱ्या डोजचे आव्हान कायम