ETV Bharat / bharat

Tragic Road Accident AP : लग्नाहुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशात अपघातात वधू पित्यासह 9 जणांचा मृत्यू - आंध्र प्रदेशात 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात ( tragic road accident andhra pradesh ) झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला ( 9 died in Car Accident at Andhra Pradesh ) आहे. कर्नाटकच्या बल्लारीहून अनंतपूरला एका लग्नात सहभागी होऊन कारमधून परतत असताना हा अपघात झाला. मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातल्या असल्याचं समजते.

Tragic Road Accident AP
आंध्र प्रदेशात 9 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Feb 7, 2022, 12:09 PM IST

Updated : Feb 7, 2022, 1:06 PM IST

अंनतपूरम ( आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात ( tragic road accident andhra pradesh ) झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला ( 9 died in Car Accident at Andhra Pradesh ) आहे. कर्नाटकच्या बल्लारीहून अनंतपूरला एका लग्नात सहभागी होऊन कारमधून परतत असताना हा अपघात झाला. मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातल्या असल्याचं समजते.

आंध्र प्रदेशात अपघातात 9 जणांचा मृत्यू

भरधाव कार लॉरीचा भीषण अपघात -

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात लग्न समारंभावरून पतरत असताना 9 जणांचा मृत्यू झाला आहे. विरुद्ध दिशेने येणारी लॉरी आणि भरधाव वेगात असलेल्या कारला धडकली. या अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्व जण जागीच ठार झाले. उरावकोंडा झोन निंबागल्लू येथील भाजप किसान मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य वेंकटप्पानायडू यांची मुलगी प्रशांती हिचा रविवारी बल्लारी येथे विवाह सोहळा होता. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नातेवाईकांनी कारमधून एकत्र प्रवास केला. ही घटना बल्लारी-अनंतपूर राष्ट्रीय महामार्गावर बुडागावी-कोत्तालपल्ली येथे घडली, यात सर्व जण जागीच ठार झाले. मृतदेह इतके अडकले होते की ते बाहेर काढता येत नव्हते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रोक्लाईनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

वधू पित्यासह नऊ जणांचा मृत्यू -

उरावकोंडा मंडल लट्टावरम निवासी स्वाती, जशवंता, जान्हवी, कनेकल्लू मंडळातील राधम्मा, सरस्वती, बोम्मनहॉल येथील अशोक, पिल्लालपल्ली येथील शिवम्मा, ब्रह्मसमुद्रम मंडल आणि रायलदोडी येथील सुभद्रम्मा वधूचे वडील व्यंकटप्पानायुडू यांच्याही अपघातात मृत्यु झाला.

मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाखांची मदत जाहीर -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिश्वभूषण हरिचंदन यांनी उरावकोंडा बुडागावी रस्ता अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला हे दुःखद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याचा सल्ला राज्यपालांनी दिला.

हेही वाचा - Asaduddin Owaisi Attack : ओवेसी हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह आज संसदेत देणार निवेदन

Last Updated : Feb 7, 2022, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.