कुल्लू(हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. तसेच हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पावसानंतर राज्यातील अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले असून, अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांची वाहने रस्त्याच्या मधोमध अडकली आहेत.
कुल्लू जिल्ह्यात अडकले पर्यटक : कुल्लू जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि कुल्लू पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात असून, अडकलेल्या पर्यटकांना बाया कटोला मार्गे मंडीकडे पाठवले जात आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कुल्लू जिल्ह्यातील विविध भागातून 10 हजार वाहने मंडीकडे रवाना झाली आहेत. तसेच जवळपास 50 हजारहून अधिक पर्यटक कुल्लू जिल्ह्याबाहेर त्यांच्या घराकडे रवाना झाले आहेत.
मणिकर्ण खोऱ्यातील पर्यटकांची सुटका : कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीपीएस सुंदर ठाकूर यांनीही मणिकर्ण खोऱ्यातील विविध भागांना भेटी दिल्या आहेत. भुंतर ते मणिकर्णा हा रस्ता भूस्खलनामुळे बंद आहे, तो तात्काळ खुला करण्यात यावा, जेणेकरून अडकलेल्या पर्यटकांनाही सुरक्षितपणे बाहेर काढता येईल, अशा सूचना यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. याशिवाय अनेक पर्यटक मणिकर्ण खोऱ्यातून पायी प्रवास करून भुंतरला पोहोचले आहेत. त्यानंतर ते वाहनातून आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत.
90 टक्के पर्यटकांची सुटका : मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्के पर्यटकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. ओटमार्गे मंडी कान रस्ता बंद असला तरी कुल्लूहून कटोलामार्गे पर्यटक पाठवले जात आहेत. अशा परिस्थितीत याठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने वाहने येण्याची वेळ प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. येथील लोकांना पेट्रोल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी पेट्रोल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक काल रात्री कुलूच्या दिशेने आणण्यात आले होते.
कुल्लू ग्रामीणचे 32 रस्ते पूर्ववत : कुल्लूचे डीसी आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, कुल्लू जिल्ह्यात सतत मदतकार्य सुरू आहे. प्रशासनाची टीमही साईंज व्हॅलीमध्ये तैनात असून, तेथेही लोकांना रेशनसह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत मदतकार्याला गती मिळावी यासाठी साईंज खोऱ्यातील रस्ता खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते पुढे म्हणाले की, कुल्लू जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 32 रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. आता उर्वरित रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
-
For any info about your friends/family stuck in Himachal Pradesh please contact DPCR of their last location/place of stay #tourists_we_are_reaching_out #himachal_floods@atrivedi21@SatwantAtwal pic.twitter.com/X0mcLslgCj
— Himachal Pradesh Police (@himachalpolice) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">For any info about your friends/family stuck in Himachal Pradesh please contact DPCR of their last location/place of stay #tourists_we_are_reaching_out #himachal_floods@atrivedi21@SatwantAtwal pic.twitter.com/X0mcLslgCj
— Himachal Pradesh Police (@himachalpolice) July 12, 2023For any info about your friends/family stuck in Himachal Pradesh please contact DPCR of their last location/place of stay #tourists_we_are_reaching_out #himachal_floods@atrivedi21@SatwantAtwal pic.twitter.com/X0mcLslgCj
— Himachal Pradesh Police (@himachalpolice) July 12, 2023
हिमाचल पोलिसांचे हेल्पलाइन क्रमांक : हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यात अडकलेल्या पर्यटकांसाठी जिल्हा स्तरावर हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जर कोणी पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले असतील आणि पोलिस किंवा प्रशासन अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नसेल, तर ते हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत मागू शकतात. यासाठी पर्यटकांना त्यांचे नेमके ठिकाण पोलिसांना सांगावे लागेल, जसे की ते कोणत्या जिल्ह्यात अडकले आहेत, कोणते ठिकाण, हॉटेल किंवा रिसॉर्ट हे बरोबर सांगावे लागेल जेणेकरून पोलिस पथक त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकेल, असे आवाहन हिमाचल पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -